WI vs PNG Live Streaming: यजमान विंडिज सज्ज, पापुआ न्यू गिनी विरुद्ध सामना

West Indies vs Papua New Guinea T20 World Cup 2024 Live Match Score: वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनीया या दोन्ही संघातील सामनयाला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या.

WI vs PNG Live Streaming: यजमान विंडिज सज्ज, पापुआ न्यू गिनी विरुद्ध सामना
WI vs PNG Live Streaming
| Updated on: Jun 02, 2024 | 12:58 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान यूएसएने कॅनडावर मात करत विजयी सलामी दिली. त्यानंतर आता या स्पर्धेतील दुसरा सामना हा यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील पहिलाच सामना असणार आहे. रोव्हमन पॉवेल वेस्ट इंडिजचं नेतृत्व करणार आहे. तर असाद वाला याच्याकडे पापुआ न्यू गिनीच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. या सामन्याबाबत महत्तावाची माहिती जाणून घेऊयात.

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना केव्हा?

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी यांच्यातील सामना 2 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना कुठे?

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना प्रोव्हिडेन्स स्टेडियम, गयाना येथे आयोजित करण्यात आला आहे.

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळेल?

विंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना मोबाईलवर फुकटात डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

वेस्ट इंडिज टीम: रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), जॉन्सन चार्ल्स (विकेटकीपर), ब्रँडन किंग, रोस्टन चेस, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, आंद्रे रसेल, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, शाई होप, ओबेद मॅकॉय, शेरफर्ड रुदरफोर्ड आणि शामर जोसेफ.

पापुआ न्यू गिनी टीम : असाद वाला (कर्णधार), किपलिन डोरिगा (विकेटकीपर), टोनी उरा, सेसे बाऊ, लेगा सियाका, हिरी हिरी, हिला वारे, चाड सोपर, अले नाओ, काबुआ मोरिया, सेमो कामिया, जॅक गार्डनर, जॉन कारीको, चार्ल्स अमिनी आणि नॉर्मन वानुआ.