WI vs SA : 7 षटकार- 2 चौकार, निकोलस पूरनचा झंझावात, विंडिज 7 विकेट्सने विजयी

West Indies vs South Africa 1st T20I Highlights: वेस्ट इंडिजने टी20i मालिकेत विजयी सुरुवात केली. निकोलस पूरन हा विंडिजच्या विजयाचा हिरो ठरला.

WI vs SA : 7 षटकार- 2 चौकार, निकोलस पूरनचा झंझावात, विंडिज 7 विकेट्सने विजयी
nicholas pooran west indies
Image Credit source: west indies cricket x account
| Updated on: Aug 24, 2024 | 5:41 PM

वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1 अशा फरकाने मालिका गमवावी लागली. मात्र त्यानंतर यजमान विंडिजने टी20i मालिकेची दणक्यात सुरुवात केली आहे. विकेटकीपर फलंदाज निकोलस पूरन याने केलेल्या नाबाद झंझावाती खेळीच्या जोरावर विंडिजने विजयी सलामी दिली आहे. विंडिजने दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. विंडिजने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

विंडिजच्या पहिल्या 3 फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. ॲलिक अथानाझे आणि शाई होप या सलामी जोडीने 8 ओव्हरमध्ये 84 धावांची भागीदारी केली. अथानाझेने 30 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 40 रन्स केल्या. त्यानंतर शाई होप आणि निकोलस पूरन यान दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. होपने या दरम्यान अर्धशतक झळकावलं. मात्र होप अर्धशतकानंतर 1 धाव करुन आऊट झाला. होपने 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. रोवमॅन पॉवेल 7 धावा करुन माघारी परतला.

त्यानंतर निकोलस पूरन याने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत विजयी खेळी साकारली. पूरनने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. पूरनने अवघ्या 26 बॉलमध्ये 2 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 65 धावा केल्या. पूरनने चौकार आणि षटकारांच्या मदतीने अर्थात 9 बॉलमध्ये 50 धावा केल्या. रोस्टन चेस 4 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून ओटनील बार्टमन याने 2 विकेट्स घेतल्य. तर क्वेना माफाकाला 1 विकेट मिळाली.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी विंडिजने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने 42 बॉलमध्ये 76 रन्स केल्या. पॅट्रिक क्रुगरने 44 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन एडन मार्करम याने 14 तर ब्योर्न फॉर्च्युइनने 11* रन्स केल्या. या चौघांव्यतिरिक्त इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. विंडिजकडून मॅथ्यू फोर्डने 3 विकेट्स घेतल्या. शामर जोसेफने दोघांना आऊट केलं. अकेल होसेन आणि रोमॅरियो शेफर्ड या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

पूरनची स्फोटक खेळी,  विंडिजची विजयी सुरुवात

वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन : रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), शाई होप, ॲलिक अथानाझे, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती, मॅथ्यू फोर्ड आणि शामर जोसेफ.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फेरेरा, पॅट्रिक क्रुगर, ब्योर्न फॉर्च्युइन, ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर आणि क्वेना माफाका.

Follow Us