विराट पुन्हा मैदानात उतरणार; त्याआधी 2027 वर्ल्ड कपबाबत केला मोठा खुलासा; क्रिकेटमधून निरोपाचे संकेत?
Virat Kohli 2027 World Cup: भारत-वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी विराट कोहलीने आपल्या यशाचे एक महत्त्वाचे रहस्य उघड केले आहे. त्याने स्वतःला एक वचन दिले आहे. तसेच निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा किंग कोहलीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. विराट कोहली त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. पण त्याच्या कामगिरीचा वेग मंदावलेला नाही. २०२७ चा विश्वचषक जिंकणे हे त्याचे अंतिम ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी तो अथक परिश्रम घेत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने क्रिकेटमधील निवृत्तीवर एक भावनिक वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलताना विराट कोहलीने स्वतः जिओहॉटस्टारला म्हटले आहे की, २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक ही त्याची शेवटची विश्वचषक स्पर्धा असेल. तो २०२७ च्या आपल्या शेवटच्या विश्वचषकात आपले सर्वस्व पणाला लावेल. विश्वचषक परदेशी परिस्थितीत खेळला जाईल. त्यासाठी खूप ऊर्जा आणि कठोर परिश्रम लागतात. हा माझा शेवटचा विश्वचषक असेल आणि हाच माझ्या प्रेरणेचा स्रोत आहे. यासाठी मी माझे सर्वस्व देईन. ५० षटकांचे स्वरूप एक अनोखे आव्हान उभे करते. हे एकाच दिवसात अडीच टी२० सामने खेळण्यासारखे आहे आणि संपूर्ण स्पर्धेत असे १० सामने खेळणे आव्हानात्मक असेल. असं त्यानं सांगितलं.
या महान फलंदाजासाठी हा पाचवा एकदिवसीय विश्वचषक असेल. कोहलीने आपल्या कारकिर्दीत २०११ आणि २०२३ मध्ये दोन विश्वचषक अंतिम सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने भारतातच खेळले गेले होते. २०११ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात कोहलीने श्रीलंकेविरुद्ध एका निर्णायक क्षणी ३५ धावांची मोलाची खेळी केली होती. २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात विराटने ५४ धावा केल्या आहेत. परंतु भारतीय संघ तो अंतिम सामना ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून हरला.
पुढील वर्षीची विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयोजित केली जाईल. बहुतांश सामने दक्षिण आफ्रिकेत खेळले जातील. जिथे विराटची एकदिवसीय सरासरी ७६.३८ आहे. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक ४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. विश्वचषकाचे स्वरूपही बदलण्यात आले असून १४ संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. प्रथम क्रमवारीत तळाच्या तीन संघांमध्ये सुपर ३ मालिका खेळवली जाईल, त्यानंतर १२ संघांमध्ये सुपर ७ टप्पा होईल.
