AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIND vs WENG 1st T20I Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना केव्हा? जाणून घ्या

WIND vs WENG 1st T20I Live Streaming | वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना कुठे होणार? सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? ही मॅच टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या.

WIND vs WENG 1st T20I Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना केव्हा? जाणून घ्या
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 05, 2023 | 5:49 PM
Share

मुंबई | टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली.त्यानंतर आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स इंग्लंड क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याला बुधवार 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध टी 20 मालिका आणि एकमेव टेस्ट सामना खेळणार आहे. इंग्लंडच्या या भारत दौऱ्याची सुरुवात ही टी 20 मालिकेने होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी 20 सामने होणार आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी वूमन्स टीम इंडिया आणि इंग्लंड टीम सज्ज आहेत. हा पहिला टी 20 सामना कधी होणार, कुठे होणार, कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना हा 6 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना कुठे होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18, डीडी स्पोर्ट्स आणि डीडी फ्री डिशवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला सामना हा मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, वाय भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका ठाकुर, तितास साधू , पूजा वस्त्राकर, कनिका आहुजा आणि मिन्नू मणी.

इंग्लंड टीम | लॉरेन बेल, माइया बूचियेर, एलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकली, सोफी एक्सेलेटन, माहिका गौर, डॅनियेले गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ, एमी जोंस, फ्रेया केम्प, हीथर नाइट, नेट स्क्विेर ब्रंट आणि डेनियेले वियाट.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...