AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIND vs WNZ 2Nd Odi : सोफी डेव्हाईन-सुझी बेट्सची अर्धशतकी खेळी, टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 260 धावांचं आव्हान

India Women vs New Zealand Women 2nd ODI 1st Innings Highligts : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 50 ओव्हरमध्ये 9 झटके देत 259 धावांवर रोखलं. आता टीम इंडियाला सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी 260 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागणार आहे.

WIND vs WNZ 2Nd Odi : सोफी डेव्हाईन-सुझी बेट्सची अर्धशतकी खेळी, टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 260 धावांचं आव्हान
Image Credit source: WHITE_FERNS X Account
| Updated on: Oct 27, 2024 | 5:30 PM
Share

न्यूझीलंड वूमन्सने टीम इंडियाला नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 260 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 259 धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडकडून कॅप्टन सोफी डिव्हाईन आणि सुझी बेट्स या जोडीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर मॅडी ग्रीन आणि जॉर्जिया प्लिमर या जोडीने 40 पेक्षा अधिक धावांची भर घातली. तर टीम इंडियाकडून राधा यादव हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे 260 धावा करुन मालिका जिंकण्याची संधी आहे.

सामन्यातील पहिला डाव

न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडसाठी कॅप्टन सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स, मॅडी ग्रीन आणि जॉर्जिया प्लिमर या चौघींना चांगली सुरुवात मिळाली. मात्र चौघींपैकी एकीलाही या खेळीचं मोठ्या धावांमध्ये रुपांतर करता आलं नाही. डिव्हाईन आणि बेट्स या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. तर मॅडी आणि जॉर्जिया या दोघींना तिथवरही पोहचता आलं नाही. सोफीने 86 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीने 79 रन्स केल्या. सुझी बेट्सने 70 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. मॅडी ग्रीन हीने 41 चेंडूत 42 धावांची भर घातली. तर जॉर्जियाने 6 चौकार आणि 1 षटाकारासह 41 धावा जोडल्य.तर इतरांना काही खास करता आलं नाही.

टीम इंडियाकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी तिघींनाच यश मिळालं. राधा यादव हीने 10 षटकांमध्ये 69 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्माने दोघींना बाद केलं. तर साईमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

भारतासमोर 260 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा.

वूमन्स न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), जेस केर, ली ताहुहू, ईडन कार्सन आणि फ्रॅन जोनास.

Follow Us
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल