AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : इंडिया-न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी, किती वाजता सुरुवात होणार?

India Women vs New Zealand Women 3rd ODI Live Streaming : टीम इंडिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स यांच्यातील 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. अशात तिसरा सामना रंगतदार होणार हे निश्चित आहे.

IND vs NZ : इंडिया-न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी, किती वाजता सुरुवात होणार?
india vs new zealand logo
| Updated on: Oct 28, 2024 | 8:28 PM
Share

टी 20 वर्ल्ड कप विजयी न्यूझीलंड महिला संघ भारत दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड वूमन्सने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. विजयी जल्लोष पूर्ण होत नाही तोवर न्यूझीलंड वूमन्स भारत दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी आली. एकूण 3 सामन्यांची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने विश्व विजेत्या न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात लोळवत विजयी सलामी दिली आणि मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर न्यूझीलंडने करो या मरो सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना हा चुरशीचा सामना होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घेऊयात.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना केव्हा?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना मंगळवारी 29 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना कुठे?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायलाम मिळेल.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, राधा यादव, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, दयालन हेमलता, रेणुका ठाकूर सिंग, श्रेयांका पाटील, उमा चेत्री आणि सायली सातघरे.

न्यूझीलंड वूमन्स टीम : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), इसाबेला गझ (विकेटकीपर), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, जेस केर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड, पॉली इंग्लिस आणि हन्ना रोवे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.