IND vs PAK : हरमनप्रीतचं डोळे वटारणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला असं उत्तर, पाहा व्हीडिओ

Harmanpreet Kaur vs Nashra Sandhu Viral Video : भारतीय महिला संघाच्या कर्णधाराला विनाकारण ठस्सन देऊ पाहणाऱ्या नश्रा संधूने स्वत:ची शोभा करुन घेतली. हरमनप्रीत कौर हीने नश्राचा फक्त होटांद्वारे कमी शब्दात जास्त अपमान केला.

IND vs PAK : हरमनप्रीतचं डोळे वटारणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला असं उत्तर, पाहा व्हीडिओ
Nashra Sandhu vs Harmanpreet Kaur Viral Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 06, 2025 | 4:44 PM

मेन्सनंतर वूमन्स टीम इंडियाने सलग चौथ्या रविवारी शेजारी पाकिस्तानची मस्ती जिरवली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी 20i आशिया कप स्पर्धेत 14, 21 आणि 28 सप्टेंबरला पाकिस्तानला पराभूत केलं. त्यानंतर सलग चौथ्या रविवारी 5 ऑक्टोबरला भारतीय महिला संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानला 88 धावांनी लोळवत आपल्या मोहिमेतील सलग दुसरा विजय मिळवला. भारताने 248 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 159 रन्सवर गुंडाळलं आणि विजय मिळवला. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाज नश्रा संधू यांच्यात काही सेकंदांसाठी मॅटर पाहायला मिळाला. हरमनप्रीतने तिच्याकडे डोळे वटारुन पाहणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाला चांगलंच उत्तर दिलं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की काय झालं?

पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताची समाधनकारक सुरुवात राहिली. मात्र त्यानंतर ठराविक अंतराने 2 विकेट्स गमावल्या. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल आऊट झाल्याने भारताचा स्कोअर हा 2 आऊट 67 असा झाला. त्यानंतर हर्लीन देओल आणि हरमनप्रीत या जोडीने टीम इंडियाला सावरलं. या दरम्यान नश्रा संधूने हरमनप्रीतला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र हरमनप्रीतने तिला समजेल अशा भाषेत उत्तर देत तिचं तोंड बंद केलं.

नश्रा संधूने टीम इंडियाच्या डावातील 22 वी तर तिच्या कोट्यातली तिसरी ओव्हर टाकली. नश्राने या ओव्हरमधील सहावा अर्थात शेवटचा बॉल टाकला. हरमनप्रीतने बॉल हलक्या हाताने मारला. नश्राने बॉल हातात घेतला आणि हरमनप्रीतच्या दिशेने फेकण्याची हुल दिली. त्यानंतर नश्रा हरमनप्रीतला डोळे दाखवून निघून गेली. हरमनप्रीतने यावर नश्राला जे उत्तर दिलंय त्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हरमनप्रीतने मोजक्याच शब्दात नश्राकडे पाहून उत्तर दिलं. हरमनप्रीतने नश्राला सुनावताना काही अपशब्दांचा आधार घेतल्याचं म्हटंल जात आहे. मात्र हरमनप्रीतने विनाकारण डिवचाल तर उत्तर मिळणारच, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं.

हरमनप्रीतचं नश्राला उत्तर

पाकिस्तानचे 12 वाजवले

दरम्यान टीम इंडियाने रविवारी पाकिस्तानला पराभूत करत त्यांचे 12 वाजवले. टीम इंडियाचा हा एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील पाकिस्तान विरुद्धचा एकूण 12 वा तर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचवा विजय ठरला. तर पाकिस्तानला वनडे वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.