AUS vs IND : ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया एकदिवसीय मालिका, पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये, पाहा वेळापत्रक
Australia vs India Odi Series 2024 : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक आणि इतर माहिती.
मेन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरा सामना हा 6 डिसेंबरला होणार आहे. तसेच वूमन्स टीम इंडियाही आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ताहलिया मॅकग्रा ही या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. तर स्मृती मंधाना ही उपकर्णधार आहे. एकूण किती सामन्यांची ही मालिका असणार आहे? सामने कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
1 मालिका आणि 3 सामने
एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 5 ते 11 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. मालिकेतील पहिले 2 सामने ब्रिस्बेनमधील अॅलन बॉर्डर फिल्ड येथे होणार आहेत. तर तिसरा आणि अंतिम सामना हा पर्थमध्ये पार पडणार आहे. ही मालिका आयसीसी चॅम्पियनशीप मॅचचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका आणि प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.
उमा चेत्रीचा समावेश
दरम्यान यास्तिका भाटीया ही या मालिकेत खेळू शकणार नाही. यास्तिकाला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागणार आहे. त्यामुळे निवड समितीने काही दिवसांपूर्वी युवा उमा चेत्री हीचा संघात समावेश केला आहे. त्यामुळे उमाचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय पदार्पण होऊ शकतं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वूमन्स टीम इंडिया
India bring in a rising wicketkeeper-batter as an injury replacement for the Australia ODIs.
More: https://t.co/l8kI2mkstH pic.twitter.com/9D9zhANXH1
— ICC (@ICC) November 28, 2024
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 5 डिसेंबर, ब्रिस्बेन
दुसरा सामना, 8 डिसेंबर, ब्रिस्बेन
तिसरा सामना, 11 डिसेंबर, पर्थ
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गर्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम आणि जॉर्जिया वॉल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तितास साधू, उमा चेत्री (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर आणि सायमा ठाकोर.