
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या दहाव्या सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रीका संघ आमनेसामने आले. या सामन्यात भारताची नाजूक स्थिती असताना ऋचा घोषने 94 धावांची खेळी करत आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. भारताने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 251 धावा केल्या आणि विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान तसं पाहिलं तर कठीण होतं. पण दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांची शैली पाहता काहीही होऊ शकतं ही भावना क्रीडाप्रेमींच्या मनात होती. त्यामुले झटपट विकेट घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आता भारताला पहिली विकेट कोण मिळवून देणार? असा प्रश्न होता. हे काम क्रांती गौडने गेलं. भारताला पहिली विकेट मिळवून दिली. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर क्रांती गौडने स्वत:च्या गोलंदाजीवर तजमिन ब्रिट्सचा अप्रतिम झेल पकडला. तजमिन ब्रिट्सला खातंही खोलता आलं नाही. क्रांती गौडच्या झेलची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
क्रांती गौडने वेगाने चेंडू टाकला, तितक्याच वेगाने ब्रिट्सन प्रहार करत समोरच्या दिशेने मारला. शॉट इतक्या वेगाने मारला होता की चौकाराच्या दिशेने जाईल असंच वाटत होतं. पण काही कळायच्या आता क्रांतीने डावा हात टाकला. फॉलो थ्रूमध्ये क्रांतीने अप्रतिम झेल पकडला. क्रांतीच्या या कामगिरीने ब्रिट्स आश्चर्यचकीत झाली. तिने पकडलेला झेल पाहून कर्णधार हरमनप्रीत आनंदाने उड्या मारू लागली. क्रांतीचा हा झेल आयसीसीने आपल्या सोशल मिडिया खात्यावर शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
समालोचन करणाऱ्या रौनक कपूरने या झेल जबरदस्त वर्णन केलं. त्याने क्रांतीच्या या झेलला हँड ऑफ गौड असा उल्लेख करून माराडोनाची आठवण करून दिली. सोशल मीडियावर अनेक जण या झेलला हँड ऑफ गॉड म्हणून संबोधित करत आहेत. खरं तर हँड ऑफ गॉड हा फुटबॉलमधील सर्वात चर्चित प्रसंग आहे. 1986 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फुटबॉलर डिएगो माराडोनाने एक गोल केला होता. त्यात हात लागून गोल गेला होता. पण रेफरीने ते पाहीलं नाही. त्यामुळे त्या गोलला हँड ऑफ गॉड असं संबोधलं गेलं होतं.