
वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. कारण आता सुरुवातीचा टप्पा संपला असून उपांत्य फेरीच्या दृष्टीने लढत सुरु झाली आहे. त्या दृष्टीने श्रीलंका आणि न्यूझीलंडचा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात श्रीलंकेने 50 षटकात 6 गडी गमवून 258 धावा केल्या आणि विजयासाठी 259 धावांचं आव्हान दिलं. पण या धावांचा पाठलाग करण्याआधीच मोठा गेम झाला. या सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना सुरु होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागली. पण पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. त्यामुळे रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी पुन्हा एकदा पावसाचा अंदाज घेतला गेला. मात्र त्यात फार काही बदल झाला नाही. त्यामुळे अखेर सामना रद्द करावा लागला. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण वाटून दिला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं तसं पाहीलं तर नुकसान झालं आहे.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन म्हणाली की, ‘मला वाटतं श्रीलंकेने चांगली फलंदाजी केली. जर तुमच्याकडे विकेट असतील तर तुम्ही थोडे अधिक आक्रमक होऊ शकता. त्यांनी आमच्यापेक्षा काही जास्त धावा केल्या. येथे 240-250 धावा चांगल्या झाल्या असत्या. वाईट हवामानानेही भूमिका बजावली असती. चांगला पाठलाग झाला असता. आज, आमच्या नियोजनाप्रमाणे ते झाले नाही.’ हा सामना न झाल्याचं दु:ख स्पष्टपणे सोफीच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिने पुढे सांगितलं, ‘आशा आहे की पुढच्या वेळी पूर्ण सामना होईल. आज आपण खेळलेल्या अर्ध्या सामन्याचा आढावा घेऊ. आउटफील्ड आम्ही भारतात खेळलेल्या सामन्यापेक्षा थोडे वेगळे होते.’
The rain has gotten heavier. pic.twitter.com/yHL1TWZr74
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 14, 2025
श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापट्टू म्हणाली की, ‘आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि चांगले क्रिकेट खेळलो. दुर्दैवाने, आम्ही खेळ पूर्ण करू शकत नाही. आमच्या हातात नाही.’ विजयासाठी दिलेल्या धावांबाबत चामरीने सांगितलं की, ‘आम्ही आणखी 20-25 धावा चुकवल्या. मी गोलंदाजांशी स्टंपवर हल्ला करण्यासाठी बोललो होतो. पावसापूर्वी आम्ही या गोष्टी बोललो होतो. पुढचा सामना महत्त्वाचा आहे कारण आमच्याकडे फक्त 3 सामने आहेत. आशा आहे की, पुढचा सामना पावसाशिवाय खेळू.’