AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 चं वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. आयसीसीने पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत पाकिस्तान या संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊयात या प्रतिस्पर्धी संघात कधी सामना होणार ते...

टी20 वर्ल्डकप 2026 चं वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना
टी20 वर्ल्डकप 2026Image Credit source: Icc X account
| Updated on: Jun 18, 2025 | 4:10 PM
Share

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून पुढच्या वर्षीच्या टी20 वर्ल्डकपसाठी जोरदारी तयारी सुरु झाली आहे. आयसीसीने महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धचं वेळापत्रक एक वर्षाआधीच जाहीर केलं आहे. या स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडकडे आहे. पुढच्या वर्षी वर्ल्डकप स्पर्धेचं दहावं पर्व आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. जून 2026 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात 12 जूनपासून होणार आहे. यास्पर्धेत एकूण 12 संघ भाग घेणार असून दोन गट करण्यात आले आहेत. गट 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिकेसह भारत पाकिस्तान संघ आहेत. तसेच इतर दोन संघ पात्रता फेरीतून या वर्षभरात निश्चित होतील. तर गट 2 मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ असतील. तर इतर दोन संघ पात्रता फेरीतून ठरतील. नियमानुसार प्रत्येक संघ साखळी फेरीत पाच सामने खेळेल आणि गटात टॉपला असलेल्या दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना 30 जून आणि 2 जुलैला होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 5 जुलैला होईल. अंतिम फेरीचा सामना लॉर्ड्सवर खेळवला जाईल. दरम्यान, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता असलेला भारत पाकिस्तान सामना 14 जून रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात असल्याने फक्त एकमेव सामना होईल. जर दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आणि जिंकले तर अंतिम फेरीत भिडू शकतात. पण तशी शक्यता कमीच आहे.

टी20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक

  • शुक्रवार 12  जून: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, एजबॅस्टन
  • शनिवार 13 जून: क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • शनिवार 13 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • शनिवार 13 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, हॅम्पशायर बाऊल
  • रविवार 14 जून: क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर, एजबॅस्टन
  • रविवार 14 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान, एजबॅस्टन
  • मंगळवार 16 जून: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, हॅम्पशायर बाऊल
  • मंगळवार 16 जून: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल
  • बुधवार 17 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले
  • बुधवार 17 जून: भारत विरुद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले
  • बुधवार 17 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, एजबॅस्टन
  • गुरुवार 18 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले
  • शुक्रवार 19 जून: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल
  • शनिवार 19 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल
  • शनिवार 19 जून: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल
  • शनिवार 20 जून: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर, हेडिंग्ले
  • रविवार 21 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • रविवार 21 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • मंगळवार 23 जून: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • मंगळवार 23 जून: श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • मंगळवार 23 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, हेडिंग्ले
  • बुधवार 24 जून: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
  • गुरुवार 25 जून: भारत विरुद्ध क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • गुरुवार 25 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • शुक्रवार 26 जून: श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • शनिवार 27 जून: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • शनिवार 27 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • शनिवार 27 जून: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, द ओव्हल
  • रविवार 28 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
  • रविवार 28 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
  • मंगळवार 30 जून: टीबीसी विरुद्ध टीबीसी (सेमीफायनल 1), द ओव्हल
  • गुरुवार 2 जुलै: टीबीसी विरुद्ध टीबीसी (सेमीफायनल 2), द ओव्हल
  • रविवार 5 जुलै: टीबीसी विरुद्ध टीबीसी (अंतिम सामना), लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

Follow Us
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.