AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता राहुल रॉय म्हणाला, ‘मला दया नको, काम द्या !’ बहिणीच्या घरी राहतो, निराधार नाही…

राहुल रॉय याने त्याच्या विषयीच्या वावड्यांवर अखेर मौन सोडले असून,आपल्यावर दया दाखवणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अभिनेत्याने म्हटलंय की, मी सुरक्षित असून आपल्या बहिणीसोबत राहत आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.

अभिनेता राहुल रॉय म्हणाला, 'मला दया नको, काम द्या !' बहिणीच्या घरी राहतो, निराधार नाही...
Actor Rahul Roy
| Updated on: May 04, 2026 | 10:32 AM
Share

एकेकाळी आशिकी चित्रपटाने एका रात्रीत स्टार झालेल्या बॉलीवूड अभिनेता राहुल रॉय याच्या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राहुल रॉय याचे अलिकडील काही रिल्स आणि व्हिडीओ पाहून राहुल रॉय याच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याच्या बातम्या सोशल मीडियात पसरल्या आहेत. आता अभिनेता राहुल रॉय याने या संदर्भात स्वत: पुढे येत खुलासा केला आहे.

राहुल रॉय याने सोशल मीडियावर त्याची बहिण हरि मां प्रियंका आणि मेहुणा रोमीर सेन यांच्या सोबतचा फोटो शेअर करीत एक मोठी पोस्ट लिहिली आहे. त्याने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की तो संपूर्णपणे सुरक्षित आहे. आणि त्याची बहिण आणि मेहुणा यांच्या सोबत तो रहात असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने म्हटलंय की त्याची बहिण त्याच्यावर खूप प्रेम करते आणि तो स्वत:ला जगातील नशीबवान भाऊ समजतो.

राहुल रॉय याने लिहिलंय की हा संदेश त्या लोकांसाठी आहे जे मला ट्रोल करत आहे. माझ्या विरोधात फेक व्हिडीओ तयार करुन माझी बदनामी करत आहेत. मी सुरक्षित आहे आणि बहिण प्रियंका आणि मेहुणा रोमीर माझी चांगली काळजी घेत आहेत. मी माझ्या बहिणीच्या घरी राहातो. मढ येथे त्यांचे सुंदर घर आहे. माझी बहिण माझ्यावर खूप प्रेम करते, मी नशीबवान भाऊ आहे.

माझा जुळा भाऊ रोहित कॅनडात राहातो. कामामुळे मी त्याला नऊ वर्षांपासून भेटलेलो नाही. माझ्याकडे कपडे आहेत, बूट आहेत. जेवण आहे. कार आहे. मी रस्त्यावर आलेलो नाही. सोशल मीडियात फेक व्हिडीओ पसरवले जात आहे. हे चुकीचे आहे. माझ्या बहिणीने मला प्रत्येक गोष्ट दिली आहे. तिला त्रास देऊ नये. मला, साधे राहायला आवडते. ही माझी आवड आहे. मी बॉडीगार्ड ठेवत नाही. कधी ऑटोने प्रवास करतो कारण जे सोयीचे जलद गतीचे असते.

राहुल रॉय याने पुढे म्हटले की मी कोणासही मुलाखत दिलेली नाही. जर मला भविष्यात चांगले चित्रपट मिळाले तर मला तुम्ही पडद्यावर पुन्हा शकता.अखेरीस त्याने लिहीलंय की मी जीवंत आहे…

येथे पोस्ट पाहा –

काय आहे वाद ?

वास्तविक काही दिवसांपासून राहुल रॉयचा काही रिल्स सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. त्यात तो डॉक्टर वनिता घाडगे सोबत त्याच्या गाण्यावर नृत्य करताना दिसला. युजर्सने या व्हिडीओंना ट्रोल केले . त्याने या संदर्भात स्पष्टीकरण देताना त्यांचे काही लिगल मॅटर्स सुरु आहेत. त्यामुळे त्याच्यावर कर्ज आहे. यासाठी तो रिल्स बनवत आहे. तसेच त्याने युजर्सना विनंती केली आहे, की माझी चेष्टा करु नका, आणि जास्त चिंता असेल तर मला योग्य काम मिळवून द्या…

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी