5, 5, 2, 4, 6, 2, 3, 3, 6, 3… ! अडीच तासातच संपला वनडे वर्ल्डकप सामना, अफ्रिकेमुळे भारताचं नुकसान

RSAW vs ENGW : वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील चौथा सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पार पडला. हा सामना दुपारी 3 वाजता सुरु झाला आणि अडीच तासातच संपला. कारण दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगा टाकली.

5, 5, 2, 4, 6, 2, 3, 3, 6, 3… ! अडीच तासातच संपला वनडे वर्ल्डकप सामना, अफ्रिकेमुळे भारताचं नुकसान
5, 5, 2, 4, 6, 2, 3, 3, 6, 3… ! अडीच तासातच संपला वनडे वर्ल्डकप सामना, अफ्रिकेमुळे भारताचं नुकसान
Image Credit source: Getty Images
| Updated on: Oct 03, 2025 | 7:08 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील चौथा सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळला गेला. 50 षटकांचा हा सामना रात्री 11 ते 12 पर्यंत चालेल असं क्रीडाप्रेमींनी वाटलं होतं. पण हा सामना अडीच तासातच संपला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. कारण इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांवर बाद झाला. त्यामुळे इंग्लंडसमोर फक्त 70 धावांचं आव्हान होतं. इंग्लंडने हे आव्हान 14.1 षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केलं. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचे 10 फलंदाज एकेरी धावांवर राहिले. तर विकेटकीपर सिनालो जाफ्ताने सर्वाधिक 22 धावा केल्या.

दक्षिण अफ्रिकेला बॅकफूटवर ढकलण्यात लिन्सी स्मिथ हीचं योगदान राहिलं. डावाच्या दुसऱ्या षटकातच तिने पहिला बळी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड होती. त्यानंतर प्रत्येक षटकात असं समीकरण जुळून आलं. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या षटकात दक्षिण आफ्रिकेने सलग तीन विकेट गमावल्या. अवघ्या 19 धावांवर दक्षिण अप्रिकेने 4 विकेट गमावल्या होत्या. त्यापैकी तीन विकेट या स्मिथच्या खात्यात गेल्या. लॉरा वोल्वार्ड 5, तझमिन ब्रिट्स 5, सुने लुस 2, मारिझान कॅप 4, अनेके बॉश 6, सिनालो जाफ्ता 22, क्लो ट्रायॉन 2, नदिन डी क्लर्क 3, मसाबता क्लास 3, अयाबोंगा खाका 6*, नॉनकुलुलेको मलाबा 3 धावांवर बाद झाले.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दक्षिण अफ्रिकेचा हा दुसरा सर्वात कमी आणि एकूण तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी न्यूझीलंडने अफ्रिकेला 51 धावांवर रोखलं होतं. तर 2019 च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध फक्त 63 धावा करता आल्या होत्या. आता इंग्लंडविरुद्ध फक्त 20.4 षटकांचा खेळ खेळत 69 धावांवर बाद झाले आहेत. इंग्लंडसमोर हे सोपं आव्हान होतं . एमी जोन्सने 40, तर टॅमी ब्यूमोंटने 21 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे इंग्लंडच्या नेट रनरेटमध्ये जबरदस्त फरक पडला आहे. यामुळे टीम इंडियाचं नुकसान झालं आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश आणि भारत यांच्या खात्यात प्रत्येकी 2 गुण आहेत. पण इंग्लंडचा नेट रनरेट हा +3.773 आहे. भारत चौथ्या स्थानी असून नेट रनरेट हा +1.255 आहे.