AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत मोहम्मद सिराज नंबर 1 गोलंदाज, मिचेल स्टार्कला टाकलं मागे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेतील भारताची ही कसोटी मालिका आहे. पहिल्याच सामन्यात मोहम्मद सिराजने 4 विकेट घेतल्या. यासह त्याने मोठी झेप घेतली आहे.

| Updated on: Oct 03, 2025 | 6:12 PM
Share
भारत वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 162 धावांवर आटोपला. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
भारताकडून मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्याने 14 षटकं टाकली आणि 40 धावा देत 4 गडी बाद केले.  या कामगिरीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या पर्वात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. यासह त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजने आक्रमक गोलंदाजी केली. चौथ्या षटकात तेजनारायण चंद्रपॉलला शून्यावर बाद केलं. त्यानंतर दहाव्या षटाकत ब्रँड किंगचा त्रिफळा उडवला. अलिक अथानासेला बाद करत तिसरी विकेट घेतली. दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसला बाद केलं आणि मानाचा तुरा शिरपेचात खोवला गेला. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
मोहम्मद सिराज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 2025 या वर्षात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. सिराजने या वर्षात 30 गडी बाद करत पहिलं स्थान पटकावलं आहे. 7 सामन्यांच्या 12 डावात एकूण 30 विकेट्स घेतल्या आहेत. मिशेल स्टार्कने 14 डावात 29 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
मोहम्मद सिराज चौथ्या पर्वातील सहावा कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यात त्याने 23  विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात चार विकेट्स घेत आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली आहे.  22 विकेटसह त्याने वेस्ट इंडिजच्या शामर जोसेफ दुसऱ्या क्रमांकावर आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.