AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 Points Table : उपांत्य फेरीसाठी जागा 2 आणि संघ 4, अफगाणिस्तानच्या विजयाने असं बदललं गणित

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन जागा शिल्लक आहेत. तर दक्षिण अफ्रिकेचं जवळपास निश्चित झालं आहे. तर दोन जागांसाठी चार संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा समावेश आहे.

World Cup 2023 Points Table : उपांत्य फेरीसाठी जागा 2 आणि संघ 4,  अफगाणिस्तानच्या विजयाने असं बदललं गणित
World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानचा एकाच वेळी तीन दिग्गज संघांना धक्का! उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट
| Updated on: Nov 03, 2023 | 8:32 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजत अफगाणिस्तानने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अफगाणिस्तानने तीन दिग्गज संघांना धक्का दिला आहे. यात पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर नेदरलँडला पराभूत करत तीन दिग्गज संघांच्या वाटेत अडसर निर्माण केला आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमध्ये रंगलेल्या सामन्यात नेदरलँडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अफगाणिस्तानचा आत्मविश्वास इतका दुणावला आहे की, नेदरलँडला 179 धावांच्या पुढे मजलच मारता आली नाही. संपूर्ण संघ 179 धावांवर बाद झाला आणि विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान अफगाणिस्तानने 3 गडी गमवून 31.3 षटकात पूर्ण केलं. त्यामुळे नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. चला जाणून घेऊयात गुणतालिकेचं गणित..

भारताने सलग सात सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर दक्षिण अफ्रिकेचंही उपांत्य फेरीचं जवळपास निश्चित आहे. दक्षिण अफ्रिकेने 7 पैकी सहा सामने जिंकत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन संघांसाठी चार संघांमध्ये चुरस आहे. यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे संघ शर्यतीत आहेत.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

जाणून घ्या उपांत्य फेरीचं गणित

  • दक्षिण अफ्रिकेचे दोन सामने उरले असून 5 नोव्हेंबरला भारताशी, तर 10 नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी सामना आहे. यापैकी एका सामन्यात विजय मिळवल्यास उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होईल.
  • ऑस्ट्रेलियाचे तीन सामने उरले आहेत. तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवल्यास सहज उपांत्य फेरी गाठेल. 4 नोव्हेंबरला इंग्लंड, 7 नोव्हेंबरला अफगाणिस्तान, तर 11 नोव्हेंबरला बांगलादेशशी सामना होणार आहे. दोन सामन्यात पराभव झाल्यास नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे.
  • न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे दोन सामने उरले आहेत. त्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. त्यामुळे या सामन्यातील विजयी संघांचं उपांत्य फेरीत वाट मोकळी होईल. तर एकाच आव्हान संपुष्टात येईल. न्यूझीलंडचा पुढचा सामना श्रीलंकेशी 9 नोव्हेंबरला होणार आहे. तर पाकिस्तानचा शेवटचा सामना इंग्लंडशी 11 नोव्हेंबरला होणार आहे.
  • अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या रेसमध्ये आहे. पण उर्वरित दोन सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या दिग्गज संघांशी आहेत. त्यामुळे दोन्ही सामने जिंकल्यास उपांत्य फेरीचं निश्चित होणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?