World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या तोंडावर टीमला मोठा झटका, कॅप्टन पहिल्या सामन्यातून आऊट!
World Cup 2023 : वर्ल्डकपच्या थराराला अवघे काही दिवस बाकी आहेत. या सामन्याआधी टीमला मोठा बसला आहे. पहिला सामना खेळण्याआधीच कर्णधार सामन्यातून बाहेर झाला आहे.

मुंबई : वर्ल्ड कप2023 च्या सामन्यांना आता काही दिवस बाकी राहिलेले आहेत. क्रीडाप्रेमींनाही कधी एकदा र्ल्ड कपच्या थराराला सुरूवात होते याची प्रतीक्षा लागली आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या वर्ल्ड कपला आत्ताच दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. वर्ल्ड कप तोंडावर असताना टीमला मोठा झटका बसला आहे. कारण वर्ल्ड कप मधील पहिला सामना खेळणाआधी संघाचा कर्णधार बाहेर गेला आहे. दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला कर्णधाराला मुकावं लागणार आहे.
नेमका कोण आहे हा खेळाडू?
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून न्यूझीलंड संघाचा कर्णधार कॅन विल्यम्सन आहे. केनला सहा महिन्यांपूर्वी आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. आधीच त्याने दुखापतीशी झगडत फिट होत संघामध्ये स्थान मिळवलं होतं मिळवत. केनची संघाच्या कर्णधार पदी त्याची नियुक्ती करण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा दुखापतीमुळे त्याला बाहेर बसावं लागणार आहे. जर केन विल्यमसन मैदानात उतरला नाहीतर टॉम लॅथम याच्याकडे किवीच्या संघाचं कर्णधारपद दिलं जावू शकतं.
वर्ल्ड कपमधील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्याआधीच न्यूझीलंड संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. केन विल्यमनसने न्यूझीलंड संघाला दोनवेळा वन डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश करून दिला होता.
केन विल्यमसन याने न्यूझीलंड संघासाठी 161 वन डे सामने खेळले असून त्यातील 153 डावांमध्ये 6554 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 13 शतके आणि 42 अर्धशतके केली आहे. टी-20 मध्ये 85 डावांमध्ये त्याने 2464 धावा केल्या असून त्यामध्ये 17 अर्धशतकांचा समावेश आहे.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (C), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग
