
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान जेतेपदासाठी एक प्रमुख दावेदार मानला जात होता. उपांत्य फेरीत तर पाकिस्तान आरामात जागा मिळवेल असंही काही माजी खेळाडूंनी भाकीत केलं होतं. सुरुवातीला दुबळ्या नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत हवाही भरली गेली. पण भारताविरुद्धच्या सामन्यात सर्व हवाच निघून गेली. भारताने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यानंतर पाकिस्तान संघ आणि व्यवस्थापनाचे नखरे सुरु झाले. बीसीसीआय आणि आयसीसीवर पराभवाचं खापर फोडलं. तसेच टीम डायरेक्टर मिकी आर्थर याने पत्रकार परिषदेत थेट आरोपही केले होते. यात हा आयसीसीपेक्षा बीसीसीआयचा इव्हेंट वाटत असल्याची टीका केली आहे. इतकंच काय तर मैदानात ‘दिल-दिल पाकिस्तान’ गाणं वाजवलं नसल्याचं सांगितलं. पाकिस्तान क्रिकेट टीमचं हे वर्ल्डकपसाठीचं थीम साँग आहे. आरोपानंतर बरीच चर्चा रंगली. उलट पाकिस्तानला आजी माजी खेळाडूंनी धारेवर धरलं. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात उघडं पाडलं.
भारतानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केलं. या सामन्यातील पराभवावर नखरे दाखवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. कारण बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हवं ते सगळं होतं. यामुळे तर पाकिस्तानला आरामात सामना जिंकू शकला असता. मग पाकिस्तान हा सामना हरला कसा? असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहे. स्टेडियममध्ये पाकिस्तान टीमचे समर्थक होतो आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते. त्याचबरोबर ‘दिल दिल पाकिस्तान’ हे थीम साँगही वाजवलं गेलं.
Aaj toh Dil Dil Pakistan bhi baja diya tha 😉#AUSvsPAK #CWC2023 pic.twitter.com/l4yaPMgMMY
— Rachit (@rachit_vk) October 20, 2023
इतकं सगळं अपेक्षित वातावरण असताना पाकिस्तानने हा सामना गमावला. दबावात संघाची काय परिस्थिती होते हे पुन्हा एकदा उघड झालं. त्यामुळे असा बहाणा करून पाकिस्तान जेतेपदाचा दावेदार ठरू शकतो का? तर अजिबात नाही. त्या उलट या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामने खेळणं गरजेचं आहे. सध्या गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. आणखी एक सामना गमावला तर उपांत्य फेरीचं खूपच कठीण होऊन जाईल.
ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 गडी गमवून 367 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानचा संघ 45.3 षटकात सर्व गडी गमवून 305 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 62 धावांनी विजय मिळवला. खराब क्षेत्ररक्षणाचं पुन्हा एकदा दर्शन झालं. एकदम सोपा झेल उसामा मीरने सोडला आणि त्या संधीचा वॉर्नरने फायदा घेतला.