AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : आयसीसीने वर्ल्डकपसाठी मस्कॉट्सची जोडी केली जाहीर, कोहली-बुमराहला पाहून पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठीचं वातावरण तयार केलं जात आहे. यासाठी आयसीसीने एका इव्हेंटमध्ये मस्कॉटची जोडी लाँच केली. पण पाकिस्तानच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

World Cup 2023 : आयसीसीने वर्ल्डकपसाठी मस्कॉट्सची जोडी केली जाहीर, कोहली-बुमराहला पाहून पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी मस्कॉट्स केले लाँच, पण प्रोमो पाहताच पाकिस्तानच्या तळपायाची आग गेली मस्तकात
| Updated on: Aug 19, 2023 | 8:36 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघ तयारी करत आहे. असं असताना आयसीसी स्पर्धेचं वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयसीसीने वर्ल्डकप स्पर्धेच्या मस्कॉटची जोडी लाँच केली आहे. आयसीसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एलिस पॅरी, जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि जॉस बटलर दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहताच पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहेत. आसीसीने शनिवारी गुरुग्राममध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये हा मस्कॉट लाँच केले आहे. या कार्यक्रमात अंडर 19 वर्ल्डकप चॅम्पियन यश धुल आणि शेफाली वर्मा उपस्थित होते.

मस्कॉटच्या रुपात पुरुष फलंदाज आणि महिला गोलंदाज दाखविण्यात आलं आहे. खेळात स्त्री पुरुष समानता दाखवण्यासाठी मस्कॉटची निवड करण्यात आली आहे. आयसीसीने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, ‘पुरुष पात्रात दबावातही शांत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. प्रत्येक शॉटमध्ये एक नवी एनर्जी आणि एक्साइटमेंट दिसत आहे.’

‘बॉलरच्या हातात टर्बो पॉवर एनर्जी आहे. वेगाने गोलंदाजी करत आहे. गोलंदाजाच्या कमरेला सहा चेंडू बांधले आहे. वेगळ्याच गेम चेंजिंग टॅक्टिक दाखवत आहे. महिला मस्कॉट कोणत्याही सामन्यात गोलंदाजीने सामना पालटण्याची क्षमता ठेवते’. असंही आयसीसीने महिला मस्कॉटबाबत सांगितलं.

आयसीसीने या मस्कॉटचं नामकरण केलेलं नाही. यासाठी त्यांनी क्रिकेट चाहत्यांना संधी दिली आहे. चाहते 27 ऑगस्टपूर्वी आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्या आवडीच्या नावाला पसंती देऊ शकतात.

पाकिस्तानला मिरच्या झोंबण्याचं कारण काय?

पाकिस्तानच्या लोकांनी आयसीसीचा प्रोमो पाहताच टीका करण्यास सुरुवात केली आहे. मस्कॉटच्या व्हिडीओत एकही पाकिस्तानी खेळाडू दाखवलेला नाही. एक पाकिस्तानी खेळाडू दाखवलाय पण त्यातही फलंदाजावर फोकस आहे. त्याच त्याच्या चेंडूवर षटकार मारताना दिसत आहे. पाकिस्तानी खेळाडूंना डावलल्याचा आरोप पाकिस्तानच्या चाहत्यांनी केला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...