AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 सामन्यात पाऊस पडल्यास कोण जिंकणार? जाणून घ्या

World Cup 2023 | वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाऊस पडल्यास कोणती टीम जिंकणार? राखीव दिवसाचा नियम काय? जाणून घ्या सविस्तर.

World Cup 2023 सामन्यात पाऊस पडल्यास कोण जिंकणार? जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 27, 2023 | 3:21 PM
Share

मुंबई | आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या 100 दिवसांआधी वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयसीसीने ट्विटद्वारे हे वेळापत्रकाची माहिती दिली आहे. वर्ल्ड कप स्पर्धा 2023 एकूण 46 दिवस रंगणार आहे. या 46 दिवसांमध्ये एकूण 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. एकूण 13 शहरांमध्ये या वर्ल्ड कप सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपसाठी एकूण 10 संघ रॉबिन राउंड पद्धतीने खेळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक टीम साखळी फेरीत इतर 9 संघाविरुद्ध 9 सामने खेळणार आहे. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनलचं आयोजन होणार आहे.

आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये पावसाची एन्ट्री झाली आहे. या पावसामुळे अनेकदा सामने रद्द करावे लागतात. तसेच कधीकधी सामना सुरु व्हायला अनेक तासांची प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्ये सामन्यादरम्यान पाऊस झाला तर काय होईल, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

वर्ल्ड कप स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. आयसीसीने साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळे साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना समसमान पॉइंट्स देण्यात येतील.

तसेच पहिला सेमी फायनल सामना हा 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडेल. तर दुसऱ्या सेमी फायनलचं कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या दोन्ही सेमी फायनल सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. तसेच अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला होणार आहे. या महाअंतिम सामन्यासाठी 20 नोव्हेंबर राखीव दिवस आहे. महत्वाची बाब म्हणजे बाद फेरीतील सामने डे-नाईट पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

या वनडे वर्ल्ड कपमधील सकाळच्या सामन्यांना 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर डे नाईट सामन्यांना दुपारी 2 वाजता सुरुवात होईल.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक

पहिला सामना कधी आणि केव्हा?

दरम्यान वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सलामीचा सामना हा 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.