AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाचा चिडीचा डाव पाहून गावस्कर भडकले, केएल राहुलला बाद करण्यासाठी अशी केली खेळी

World Cup 2023, IND vs AUS Final : अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर टीम इंडियाला 200 धावा करताना दमछाक झाल्याची पाहायला मिळाली. त्यामुळे भारतावर दबाव वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने खेळी केली.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाचा चिडीचा डाव पाहून गावस्कर भडकले, केएल राहुलला बाद करण्यासाठी अशी केली खेळी
IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने केएल राहुलसाठी रचला असा सापळा, अम्पायर तिसऱ्या पंचांकडे गेल्यानंतर गावस्करांनी व्यक्त केला राग
| Updated on: Nov 19, 2023 | 5:21 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडिया पूर्णपणे बॅकफूट गेल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर गाडी रुळावरून घसरली. शुबमन गिलनंतर रोहित शर्मा बाद झाला. त्यामुळे टीम इंडिया दबावात असताना श्रेयस अय्यर तंबूत परतला. त्यामुळे मधल्या फळीत विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर सावध खेळण्याची जबाबदारी आली. विराट कोहली 63 चेंडूत 54 धावा करून बाद झाला आणि रवींद्र जडेजा फलंदाजी वर आला. पण तो सुद्धा काही खास करू शकला नाही. 22 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. त्यामुळे टीम इंडियावर दबाव असल्याची पूर्ण जाणीव ऑस्ट्रेलियन संघाला होती. त्यामुळे आणखी दबाव टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने नवीन रणनिती आखली. सेट असलेल्या केएल राहुल याला बाद करण्यासाठी आणि रिव्ह्यू कायम ठेवण्यासाठी पंचांकडे अपील केली.

केएल राहुलच्या स्टंपिंगसाठी स्क्वेअर लेगच्या पंचांकडे अपील केली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या जोरदार अपीलला दाद देत स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या पंचांनी थर्ड अम्पायरकडे इशारा केला. तिसऱ्या पंचांनी तंत्राद्वारे पाहताना पहिल्यांदा बॅटला कट लागली की नाही याची तपासणी केली. त्यानंतर स्टंपिंगसाठी क्रिजमध्ये पाय होता की नाही याची तपासणी केली. पण केएल राहुलचा पूर्ण पाय क्रिजमध्ये होता. त्यामुळे ते चित्र पाहून समालोचक सुनील गावस्कर वैतागले.

काय म्हणाले सुनील गावस्कर?

‘ही कोणत्या प्रकारची पंचगिरी आहे. पंचांनी कट नसल्याचं सांगितलं आणि ऑस्ट्रेलियाने स्टंपिंगसाठी स्क्वेअर लेगच्या पंचांकडे दाद मागितली. जर केएल राहुलचा पाय क्रिजमध्ये होता तर तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याची काय गरज होती. हे तर रिव्ह्यू वाचवून आणि कट लागली असेल बाद घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चाल आहे. नशिबाने कट नव्हती म्हणून बरं झालं. नाही तर स्टपिंगसाठी अपील आणि कट आऊट झाला असता.’, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

Follow Us
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया