AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 Point Table : दुबळ्या नेदरलँडला हरवलं खरं पण पाकिस्तानला नेट रनरेटमध्ये फटका, कसं ते समजून घ्या

World Cup 2023 Point Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकत चालली आहे. रॉबिन राउंड पद्धतीत प्रत्येक संघाला 9 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे गुणांसह नेट रनरेटही महत्त्वाचा ठरणार आहे.

World Cup 2023 Point Table : दुबळ्या नेदरलँडला हरवलं खरं पण पाकिस्तानला नेट रनरेटमध्ये फटका, कसं ते समजून घ्या
World Cup 2023 Point Table : पाकिस्तानने नेट रनरेट वाढण्याची संधी गमावली, नेदरलँडला तसं पराभूत करण्यात अपयश Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 06, 2023 | 10:01 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील सामने सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात काही संघांना कठीण, तर संघांना सोप्पा पेपर आला आहे. त्यामुळे कठीण संघासोबत दोन गुण आणि सोप्या संघासोबत 2 गुणांसह नेट रनरेट वाढवण्याची संधी आहे. असंच पहिल्या दोन सामन्यात पाहायला मिळालं. न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन्ही तगडे संघ आहेत. त्यामुळे पहिला सामना चुरसीचा होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही न्यूझीलंडने एकतर्फी सामना जिंकत स्पर्धा पुढे कशी जाणार आहे याची झलक दाखवली. तर दुसरीकडे पाकिस्तानला जेतेपदाच्या दावेदारापैकी एक मानलं जात आहे. पण नेदरलँडने संपूर्ण संघ बाद करत आणखी मेहनतीचं गरज असल्याचं दाखवलं आहे.

पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड

नाणेफेकीचा कौल जिंकत नेदरलँडने पाकिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यामुळे पाकिस्तान आरामात 300 पार धावा करेल असा अंदाज होता. मात्र घडलं वेगळंच..पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. इतकंच काय तर मधल्या फळीच्या फलंदाजांना मोठ्या धावांसाठी झगडावं लागलं. पाकिस्तानने 49 षटकात 10 गडी गमवून 286 धावा केल्या आणि विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना नेदरलँड 150 च्या बाद होईल असं वाटत होतं. पण झालं भलतंच..नेदरलँडने 41 षटकं खेळत सर्वबाद 205 धावा केल्या.

पाकिस्तानला हा सामना जिंकून दोन गुण मिळाले खरे…पण त्यांच्या नेट रनरेटमध्ये तसा मोठा फरक दिसला नाही. उपांत्य फेरीसाठी शेवटी नेट रनरेटच कामी येणार आहे. समान गुण असले की नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीचं गणित ठरतं. त्यामुळे अपेक्षित रनरेट न ठेवल्याने पाकिस्तानी क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ 2 गुण आणि +2.149 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ 2 गुणांसह +1.620 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंचा संघाला पराभवासह नेट रनरेटचा फटका बसला आणि सर्वात शेवटी आहे. तर नेदरलँडने पाकिस्तानला चांगलंच झुंजवल्याने 9व्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

नेदरलँडचा संघ: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.