ODI World cup 2023 : भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs PAK वर्ल्ड कपचा महामुकाबला

ODI World cup 2023 : किती तारखेपासून सुरु होणार ODI World cup 2023? या शहरातील प्रेक्षकांना भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय वर्ल्ड कपला मजाच येणार नाही.

ODI World cup 2023 : भारतातील 'या' स्टेडियममध्ये रंगणार IND vs PAK वर्ल्ड कपचा महामुकाबला
ind vs pak world cup
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 9:07 AM

मुंबई : क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये खरी रंगत येते, ते भारत-पाकिस्तान सामन्याने. 1992 पासून वनडे असो किंवा T 20 दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सामने झाले आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना नसेल, तर त्या वर्ल्ड कपला मजाच येणार नाही. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी क्रिकेटरसिक वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने प्रतिक्षा करत असतात.

वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकदाच पाकिस्तानच्या टीमला भारताला हरवणं शक्य झालय. टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकदाच पाकिस्तानी टीमने भारतावर विजय मिळवला होता.

नेहमीच टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा सरस

हा एक अपवाद सोडल्यास, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध अजिंक्य राहिली आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकदाही पाकिस्तानी टीमला भारतावर विजय मिळवता आलेला नाही. टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या स्टेजवर नेहमीच पाकिस्तान विरुद्ध सरस खेळ दाखवलाय.

वर्ल्ड कपच वेळापत्रक BCCI कधी जाहीर करणार?

यावर्षी वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंटला सुरुवात होईल. इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर BCCI वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर करणार आहे. सर्वच क्रिकेट रसिकांना उत्सुक्ता आहे ती, भारत-पाकिस्तान सामन्याची. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान लढत यंदा कुठल्या शहरात रंगणार? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.

भारत-पाक सामन्यासाठी त्याच स्टेडियमची निवड का?

यंदा ODI वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चाहते येतात. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ स्टेडियम आहे. 1 लाख प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता या स्टेडियममध्ये आहे. त्यामुळे BCCI ने भारत-पाकिस्तान लढतीसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमची निवड केली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलय. वर्ल्ड कपमध्ये एकूण 48 सामने होतील. बाद फेरीचे तीन राऊंड होतील. यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा 46 दिवस चालणार आहे. सात ठिकाणी साखळी फेरीचे सामने होतील. टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला, तर तिथे भारताचे दोन सामने होतील.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.