World Cup 2023 : टीम इंडियाचा ‘हा’ युवा खेळाडू म्हणजे भावी वीरेंद्र सेहवाग, बॉलरलाही भरते धडकी!

टीम इंडियाला ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. बीसीसीआय वर्ल्ड कपसाठी मजबूत संघ बांधणी करत आहे. असा युवा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये भारताचा माजी2011 साली महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाला ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. बीसीसीआय वर्ल्ड कपसाठी मजबूत संघ बांधणी करत आहे. असा युवा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये भारताचा माजी आक्रमक खेळाडू वीरेंद्र सेहवागची झलक दिसते. आक्रमक खेळाडू वीरेंद्र सेहवागची झलक दिसते.

World Cup 2023 : टीम इंडियाचा हा युवा खेळाडू म्हणजे भावी वीरेंद्र सेहवाग, बॉलरलाही भरते धडकी!
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी करायचं असं काही, विरेंद्र सेहवाग याने केला खुलासा
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 04, 2023 | 9:19 PM

मुंबई : यंदाचा वर्ल्ड कप 2023 भारतात होणार असून टीम इंडियाला इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीची एकही ट्रॉफी भारताला जिंकता आली नाही. 2011 साली महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाला ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. बीसीसीआय वर्ल्ड कपसाठी मजबूत संघ बांधणी करत आहे. असा युवा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये भारताचा माजी आक्रमक खेळाडू वीरेंद्र सेहवागची झलक दिसते.

कोण आहे ‘तो’ युवा खेळाडू?

आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमामध्ये या युवा खेळाडू यशस्वी जयस्वाने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या या खेळाडूने शतकही झळकवलं होतं. यशस्वी जयस्वाल याने मुंबई इंडिअन्सविरूद्ध  शतक ठोकलं होतं.  यशस्वीने 53 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं होतं यामध्ये त्याने 13 चौकार आणि 6 षटकारांच्या मारलं होतं. अखेरच्या षटकात 62 चेंडूत 124 धावा करून यशस्वी बाद झाला. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 8 षटकार मारले. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो चौथा सर्वात तरुण फलंदाज ठरला होता. या खेळीमध्ये त्याने 124 धावा केल्या होत्या, ही राजस्थानकडून लीगमधील सर्वात मोठी खेळी होती.

यशस्वी जयस्वाल हा आक्रमक सलामीवीर असून त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामने पलटवले आहेत. राजस्थान संघाचा स्टार खेळाडू जॉस बटलर यंदा इतका काही प्रभावी वाटला नाही मात्र यशस्वीने सलामीची जबाबदारी स्वत:वर घेतली.  जयस्वाल याचा फॉर्म पाहता त्याला एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप संघामध्ये संधी देण्यात यावी अशी मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

दरम्यान, वीरेंद्र सेहवागसारखा जयस्वालसुद्धा पहिल्या चेंडूपासून समोरील गोलंदाज आक्रमण करतो. आयपीएलमध्ये त्याने सलग पाचवेळा चौकार मारले  होते. विरोधी गोलंदाज कोण आहे याचा विचार न करता त्याच्यावर तुटून पडणं हे त्याच्या डोक्यात फिक्स असतं.