AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; नोंदवला गेला वर्ल्ड रेकॉर्ड, 41 षटकारांसह ठोकल्या 487 धावा

क्रिकेटमध्ये रोज नवे विक्रम रचले आणि मोडले जातात. असाच एक विक्रम टी20 क्रिकेटमध्ये रचला गेला आहे. या सामन्यात 14 पेक्षा अधिकच्या धावगतीने धावांचा पाऊस पाडला गेला आहे. टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं.

टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; नोंदवला गेला वर्ल्ड रेकॉर्ड, 41 षटकारांसह ठोकल्या 487 धावा
टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; नोंदवला गेला वर्ल्ड रेकॉर्ड, 41 षटकारांसह ठोकल्या 487 धावाImage Credit source: Bulgaria Cricket/ Instagram
| Updated on: Jul 11, 2025 | 11:07 PM
Share

एसीएन बल्गेरिया टी20 ट्राय सिरीजमध्ये एक मोठा विक्रम रचला गेला आहे. एकाच सामन्यात धावांचा पाऊस पडला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहता आली. हा सामना बल्गेरिया आणि जिब्राल्टर यांच्यात खेळला गेला. हा सामना बल्गेरियाने जिंकला असला तरी दोन्ही बाजूच्या फलंदाजांनी गोलंदाजांची धुलाई केली. टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 14.18 च्या धावगतीने धावा केल्या गेल्या. यापूर्वी 2009 मध्ये असं घडलं होतं. तेव्हा न्यूझीलंड आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा 13.76 च्या धावगतीने धावसंख्या झाल्या होत्या. पण या सामन्यात काही चित्र वेगळं होतं. एकूण 41 षटकार मारण्यात आले . तर दोन्ही डावांमध्ये मिळून 35 पेक्षा कमी षटकात 450 हून अधिक धावा केल्या आणि जुना विक्रम मोडला गेला आहे. या विजयासह बुल्गेरियाचा संघ गुणतालिकेत चार गुणांसह अव्वल स्थानी आहे. जिब्राल्टर पराभूत झाला असला तरी त्यांच्याकडेही चार गुण आहेत. पण नेट रनरेटच्या गणितात बुल्गेरिया पुढे आहे. तुर्की या मालिकेत सहभागी असून दोन्ही सामन्यात पराभूत झाली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत बुल्गेरिया आणि जिब्राल्टर हा सामना होईल.

जिब्राल्टरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 243 धावा केल्या. यात सलामीला आलेल्या फिल रॅक्सने 33 चेंडूत 73 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि 8 षटकार मारले. तर कर्णधार इयान लॅटिनने 51 धावांची खेळी केली. यात त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. लुईस ब्रूसने 24 धावा, तर ख्रिस पाईलने 22 धावांची खेळी केली. बुल्गेरियाकडून जॅकब गुलने चार षटकात 37 धावा देत 4 गडी बाद केले.

या धावांचा पाठलाग करताना बुल्गेरियाने 15 षटकातच सामना संपवला. बुल्गेरियाकडून मनन बशीरने आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने 21 चेंडूत 3 चौकार आणि 9 षटकार मारत 70 धावांची खेळी केली. तर इसा जरूने 24 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार मारत 69 धावा केल्या. मिलनग गोगेवने 69 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार ख्रिस लाकोवने 19 धावा केल्या. जिब्राल्टरकडून लुईस ब्रूसने चार षटकात 48 धावा देत दोन गडी बाद केले.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.