WPL 2023 : गुजरात जायंट्स टीममध्ये वाद, स्टार खेळाडूच्या पोस्टवरुन खळबळ

| Updated on: Mar 20, 2023 | 12:26 PM

WPL 2023 : 60 लाख रुपयांमध्ये विकत घेतलेल्या खेळाडूचा आपल्याच फ्रेंचायजीवर हल्लाबोल. तिने गुजरात जायंट्सची पोलखोल केलीय. गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याआधी या खेळाडूला बाहेर करण्यात आलं.

WPL 2023 : गुजरात जायंट्स टीममध्ये वाद, स्टार खेळाडूच्या पोस्टवरुन खळबळ
Gujarat Giants
Image Credit source: twitter
Follow us on

WPL 2023 : गुजरात जायंट्सची टीम वूमेन्स प्रीमियर लीगमधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. 7 पैकी त्यांनी फक्त 2 मॅच जिंकल्या आहेत. 4 पॉइंट्ससह ते गुणतालिकेत सर्वात तळाला आहेत. गुजरात टीमवर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची टांगती तलवार आहे. आता वेस्ट इंडिजची महिला खेळाडू डियांड्रा डॉटिनने सुद्धा गुजरात जायंट्स टीमला घेरलय. डॉटिनने सोमवारी सोशल मीडियावर 56 लाइनची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने प्रत्येक तारखेचा खुलासा केलाय, जेव्हा ती फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न करत होती. या बद्दल फ्रेंचायजी बरोबर कधी काय बोलण झालं? या बद्दल सुद्धा तिने माहिती दिलीय.

लीग सुरु होण्याधी गुजरातने डॉटिनला बाहेर केलं. तिला लिलावात गुजरात जायंट्सने 60 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. फ्रेंचायजीने डॉटिनला बाहेर करण्यामागे फिटनेस सर्टिफिकेट कारण असल्याच सांगितलं. तिच्याकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळालं नव्हतं. या संपूर्ण प्रकरणात वाद सुरु आहे. डॉटिनने पूर्ण विषय सांगितलाय.

3 मेलमध्ये वेगवेगळे मुद्दे

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ट्रेनिंग सुरु केल्याच डॉटिनने सांगितलं. पण फ्रेंचायजीने तिला पुन्हा मेडिकल टेस्ट आणि क्लीयरन्स आणायला सांगितलं. अन्य खेळाडूंकडे असं काही मागितलं नाही, असं डॉटिनच म्हणणं आहे.

डॉटिनला फेब्रुवारी महिन्यात अडानी स्पोर्ट्सलाइनकडून 3 दिवसात 3 मेल मिळाले. तिन्ही मेलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे ती WPL मध्ये खेळू शकली नाही.

किम गार्थला संधी

डॉटिन बाहेर गेल्यानंतर गुजरातने ऑस्ट्रेलियाच्या किम गार्थचा स्क्वॉडमध्ये समावेश केला. डॉटिनच्या फिटनेसबद्दल फ्रेंचायजीने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. आधी फ्रेंचायजीने तिला बाहेर करण्यामागे मेडिकलच कारण दिलं. त्यानंतर मेडिकल क्लीयरन्सच कारण दिलं. डॉटिनने आता या बद्दल आपली बाजू मांडलीय.