WPL 2024 Auction : अनकॅप्ड भारतीय खेळाडू कश्वी गौतमसाठी गुजरात जायंट्सने खजिना केला रिता! लावली इतकी मोठी बोली

वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठीचा लिलाव सध्या सुरु आहे. 165 खेळाडूसांठी बोली लावली जात आहे. काही खेळाडूंना भाव मिळाला तर काही खेळाडूंच्या तोंडाला फक्त पानं पुसली गेली. ऑस्ट्रेलियाच्या अन्नाबेल सुथरलँडवर सर्वाधिक बोली लागली. त्यानंतर आता अनकॅप्ड कश्वी गौतमवर तितकीच बोली लागली आहे. त्यामुळे कश्वी गौतम आहे तरी कोण? असा प्रश्न पडला आहे.

WPL 2024 Auction : अनकॅप्ड भारतीय खेळाडू कश्वी गौतमसाठी गुजरात जायंट्सने खजिना केला रिता! लावली इतकी मोठी बोली
WPL 2024 Auction : अनकॅप्ड अष्टपैलू कश्वी गौतमसाठी गुजरात जायंट्सने सर्वस्वी लावलं पणाला, खात्यातील अर्धी रक्कम फक्त तिच्यासाठी मोजली
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 5:37 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 साठी 165 खेळाडूंवर बोली सुरु आहे. काही खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली तर काही खेळाडू अनसोल्ड राहिले. यापैकी सर्वाधिक चर्चा रंगली ती दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाच्या अन्नाबेल सुथरलँडला लावलेल्या बोलीची.. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. पण दिल्लीने दोन कोटी रक्कम मोजून तिला आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात चर्चा रंगली ती भारताच्या अनकॅप्ड अष्टपैलू कश्वी गौतम हिच्यासाठी लावलेल्या बोलीची. कश्वी गौतम हिची बेस प्राईस अवघी 10 लाख रुपये होती. पण या खेळाडूला घेण्यासाठी युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. या लिलावासाठी गुजरात टायटन्सकडे 5.95 कोटी रुपये, तर युपी वॉरियर्सकडे 4 कोटी रुपयांची रक्कम होती. त्यामुळे कश्वी गौतमसाठी दोन्ही फ्रेंचाईसीने आपली खजिना खुला केला. ही बोली इतकी वर गेली की बेस प्राईस 10 लाखावरून 20 पटीने वाढून 2 कोटी झाले.

गुजरात जायंट्सने कश्वी गौतमसाठी 5.95 कोटीपैकी 2 कोटी मोजले. अर्थात आपल्या रक्कमेतील निम्मी रक्कम मोजली. युपी वॉरियर्सनेही 2 कोटींच्या आसपास बोली लावली होती. पण गुजरात जायंट्सने 2 कोटी मोजून तिला आपल्या संघात सहभागी करून घेतलं आहे. कश्वी गौतम ही सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू ठरली आहे. आता ती गुजरात जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. अष्टपैलू कश्वी गौतमचा गुजरात जायंट्सला नक्कीच फायदा होईल.

20 वर्षीय कश्वी गौतम चंदीगढकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. 2020 मध्ये अरुणाचल प्रदेश विरुद्ध देशांतर्गत स्पर्धेत 10 गडी बाद केल्याने चर्चेत आली होती. त्यानंतर 2022 मध्ये अंडर 19 वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली होती. मागच्या सीनियर वुमन्स टी20 ट्रॉफीत तिने 12 गडी बाद केले होते. या कामगिरीमुळे तिला अंडर 23 अशिया कपमध्ये खेळण्याची सधी मिळाली आहे.  लिलावात गुजरात टायटन्सकडे सर्वाधिक 5.95 कोटी रुपये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे 3.35 कोटी, दिल्ली कॅपिटल्सकडे 2.25 कोटी, युपी वॉरियर्सकडे 4 कोटी, तर मुंबईकडे 2.1 कोटी रुपये होते. यापैकी आता काही रक्कम खर्ची झाली असून उर्वरित रक्कमेतून खेळाडू घ्यावे लागणार आहेत.

युपी वॉरियर्सचा सध्याचा संघ : एलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पारश्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, तहलिया मॅग्रा

गुजरात जायंट्सचा सध्याचा संघ : एशले गार्डनर, बेथ मूनी, दयालन हेमलता, हर्लिन देओल, लॉला वोल्वार्ट, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.