AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2024 Final, RCB vs DC : दिल्ली बंगळुरुमधील हे खेळाडू ठरतील भारी! जाणून घ्या आकडेवारी आणि प्लेइंग इलेव्हन

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. 17 मार्चला दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना रंगणार आहे. वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात नव्या विजेत्याची भर पडणार आहे. असं असताना दोन्ही संघांतील कोणते खेळाडू भारी पडतील ते जाणून घेऊयात..

WPL 2024 Final, RCB vs DC : दिल्ली बंगळुरुमधील हे खेळाडू ठरतील भारी! जाणून घ्या आकडेवारी आणि प्लेइंग इलेव्हन
WPL 2024 Final, RCB vs DC : दिल्ली बंगळुरुमधील या खेळाडूंवर सामना फिरवण्याची ताकद, जाणून घ्या
| Updated on: Mar 16, 2024 | 9:32 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं दुसरं पर्व एकदम रंगतदार झालं. गेल्या वर्षीच्या तुलनेत या स्पर्धेकडे क्रीडारसिकांचा ओढा जास्त राहिला. एक एक सामने तोडीस तोड झाले. त्यामुळे कोणता सामना कधी फिरेल सांगता येत नाही. असताना दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी राहून दिल्ली कॅपिटल्सला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळालं. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये मुंबईला 5 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चार वेळा आमनेसामने आले आहेत. चारही सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचं पारडं जड आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या काही खेळाडूंचा फॉर्म पाहता सामना वाटतो तितका सोपा जाणार नाही. दिल्लीच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणण्याची क्षमता बंगळुरुच्या खेळाडूंमध्ये आहे.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एलिस पेरी ऑरेंज कॅपची मानकरी आहे. आतापर्यंत एलिस पेरीने 8 सामने खेळले असून 312 धावा केल्या आहेत. यात प्लेऑफमध्ये ठोकलल्या 66 धावा सर्वोत्तम आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार तिच्या मागोमाग 308 धावांवर आहे. त्यामुळे या दोन फलंदाजांमध्ये वरचढ कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्मृती मंधानाची बॅटही चांगली चालली असून 269 धावा केल्या आहेत. दिल्लीची शफाली वर्मा आणि बंगळुरुची रिचा घोष यांचीही जुगलबंदी पाहायला मिळेल. तर दिल्लीची जेमिमा रॉड्रिग्स आणि एलिस कॅप्से कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद ठेवतात.

दिल्लीकडून मॅरिझेन कॅप ही सर्वात घातक गोलंदाज ठरली आहे. तिने सहा सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. दिल्लीची जेस जोनासेन आणि राधा यादवही या देखील मागे नाहीत. बंगळुरुकडून आशा शोभना हीनेही 10 विकेट्स, तर सोफी मोलिनेक्सने 9 विकेट्स घेतल्या आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, तितास साधू, शिखा पांडे, राधा यादव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिना वेरेहम, श्रेयंका पाटील, श्रद्धा पोखरकर, आशा शोबाना, रेणुका सिंग.

या टीमवर असेल नजर

टीम 1- ऋचा घोष (विकेटकीपर), मेग लॅनिंग, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, एलिस पेरी (कर्णधार), सोफी डेव्हाईन, मेरिझान कॅप (उपकर्णधार), एलिस कॅप्से, जेस जोनासेन, राधा यादव.

टीम 2- ऋचा घोष (विकेटकीपर), स्मृती मंधाना, मेग लॅनिंग, शफाली वर्मा, एलिस पेरी (कर्णाधार), मेरिझान कॅप, एलिस कॅप्से, जेस जोनासेन (उपकर्णधार), तितास साधू, सोफी मोलिनेक्स

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....