Auction : 15 डिसेंबरला पुन्हा ऑक्शन, 120 खेळाडूंची नावं समोर, बीसीसीआयची मोठी घोषणा

Auction : भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2025 साठी काही दिवसांपूर्वी 2 दिवसीय मेगा ऑक्शन पार पडलं. त्यानंतर आता पुन्हा मेगा ऑक्शन होणार आहे. बीसीसीआयने मेगा ऑक्शनसाठी 120 खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

Auction : 15 डिसेंबरला पुन्हा ऑक्शन, 120 खेळाडूंची नावं समोर, बीसीसीआयची मोठी घोषणा
Mumbai Indians owner neeta ambani action tableImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 12:10 AM

अवघ्या काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) 2 दिवसीय मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनचं सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात आयोजन करण्यात आलं होतं. एकूण 10 संघांनी 180 खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतंल. श्रेयस अय्यर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा सर्वात युवा कोट्याधीश खेळाडू ठरला. राजस्थानने वैभवला 1 कोटी 10 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट वर्तुळातून ऑक्शनबाबत मोठी बातमी आली आहे.

क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा ऑक्शनचा थरार पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने याबाबतची घोषणा केली आहे. आयपीएलनंतर आता डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी (WPL 2025) ऑक्शन होणार आहे. बंगळुरु येथे 15 डिसेंबरला दुपारी 3 वाजता मिनी ऑक्शनला सुरुवात होणार आहे. डब्ल्यूपीएला 2023 पासून सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 5 संघ खेळतात. नियमांनुसार, प्रत्येक फ्रँचायजी आपल्या टीममध्ये जास्तीत 18 खेळाडू ठेवू शकते. तसेच परदेशी खेळाडूंबाबतची कमाल मर्यादा ही प्रत्येक संघासाठी 6 इतकी आहे. मिनी ऑक्शनआधी प्रत्येक संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यामुळे करारमुक्त आणि नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे.

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामासाठी या फ्रँचायजीने ज्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं होतं त्यापैकी काही खेळाडूंना या आगामी तिसऱ्या पर्वाआधी रिलीज केलं. त्यामुळे आता  त्याच करारमुक्त खेळाडूंवरही पुन्हा बोली लागणार आहे. मात्र त्यापैकी कोणत्या खेळाडूंना घेतलं जाणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

डब्ल्यूपीएल 2025 मिनी ऑक्शन कुठे?

120 खेळाडूंवर बोली

बीसीसीआयने डब्ल्यूपीएल मिनी ऑक्शनसाठी 120 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या 120 खेळाडूंमध्ये 91 भारतीय, 29 परदेशी आणि 3 असोसिएट देशाचे खेळाडू आहेत. या 91 भारतीयांपैकी 82 अनकॅप्ड खेळाडू आहे. तर 29 परदेशी खेळाडूंमध्ये 8 अनकॅप्ड खेळाडू आहेत. आपल्या देशासाठी न खेळेलेले खेळाडू म्हणजे अनकॅप्ड खेळाडू होय.

एकूण 5 संघांना जास्तीत जास्त 19 खेळाडूंची गरज आहे. त्या 19 पैकी 5 जागा या परदेशी खेळाडूंसाठी आहेत. त्यामुळे 120 पैकी फक्त 19 खेळाडूंचं भाग्य फळफळणार आहे. तर 101 खेळाडू कमनशिबी ठरणार आहेत.

कोणत्या टीमकडे किती रक्कम?

प्रत्येक फ्रँचायजीला 15 कोटी रुपये रक्कम लिलावासाठी देण्यात आली. मात्र प्रत्येक संघाने 7 नोव्हेंबरला गरजेनुसार काही खेळाडू रिटेन केल्याने ती रक्कम कमी जास्त प्रमाणात आहे. गुजरात जायंट्सकडे ऑक्शनसाठी सर्वाधिक 4 कोटी 40 लाख रुपये इतकी रक्कम आहे. गुजरातला 4 खेळाडूंची गरज आहे. त्यामुळे गुजरात तगडे खेळाडू घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. यूपी वॉरियर्सकडे 3 कोटी 90 लाख इतकी रक्कम आहे. यूपीने 15 खेळाडू रिटेन केले होते. त्यामुळे यूपी जास्तीत जास्त 3 खेळाडू घेऊ शकते.

गतविजेता आरसीबीच्या खात्यात 3 कोटी 25 लाख रुपये आहेत. आरसीबी जास्तीत जास्त 4 खेळाडू मिनी ऑक्शनमधून घेऊ शकते. मुंबईकडे 2.65 तर दिल्लीकडे 2.5 कोटी रक्कम आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी 4-4 खेळाडूंची गरज आहे.

टीम आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं

आरसीबी : स्मृति मानधना (कॅप्टन), सब्बीनेनी मेघना, ऋचा घोष, एलिसे पेरी, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, सोफी डिवाइन, रेणूका सिंह, सोफी मोलिनेक्स, एकता बिष्ट, केट क्रॉस, कनिका आहूजा आणि डॅनी व्याट (ट्रेड विंडो).

मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नॅट सायवर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमेलिया कीर, क्लो ट्रायॉन, अमनजोत कौर, साईका इशाक, जिंतिमनी कलिता, सजीवन सजना, कीर्तन बालाकृष्णन आणि शबनीम इस्माइल.

दिल्ली कॅपिटल्स : शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, तानिया भाटिया, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, मिन्नू मणी, तितास साधु, मेग लॅनिंग, एलिस कॅप्सी, मारिजान काप, जेस जोनासेन आणि एनाबेल सदरलँड.

यूपी वॉरियर्स : एलिसा हीली (कॅप्टन), दीप्ति शर्मा (उपकर्णधार), ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सहरावत, सोफी एक्लेस्टोन, चामरी अटापट्टू, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी, उमा छेत्री, पूनम खेमनार, साइमा ठाकोर, गौहर सुल्ताना आणि वृंदा दिनेश.

गुजरात जायंट्स : हरलीन देओल, दयालन हेमलता, तनुजा कंवर, शबनम शकील, मन्नत कश्यप, वेदा कृष्णमूर्ति, तरन्नुम पठान, सयाली सातघरे, मेघना सिंह, तृषा पूजिता, प्रिया मिश्रा, बेथ मूनी, एशले गार्डनर, लौरा वोल्वार्ड्ट, ली ताहुहु, फोएबे लिचफील्ड आणि कॅथरीन ब्राइस.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.