WPL 2025 : गुजरात डब्ल्यूपीएलमध्ये पहिल्यांदाच ऑलआऊट, मुंबईसमोर 121 धावांचं आव्हान
Gujarat Giants Women vs Mumbai Indians Women 1st Innings Highlights : वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात गुजरात जायंट्स पहिल्यांदाच ऑलआऊट झाली आहे. मुंबईने गुजरातचं 120 धावांवर पॅकअप केलं.

वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 121 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरात टीम वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलआऊट झाले आहेत. मुंबईने गुजरातला 20 ओव्हरमध्ये 120 धावांवर ऑलआऊट केलं. गुजरातसाठी हर्लीन देओल आणि काशवी गौतम या दोघींनी सर्वाधिक धावा केल्या. आता मुंबई इंडियन्स या धावांचा यशस्वी पाठलाग करते की गुजरात पलटणला रोखते? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरातची बॅटिंग
गुजरातसाठी हर्लीन देओल हीने 31 बॉलमध्ये 103.23 च्या स्ट्राईक रेटने 32 रन्स केल्या. हर्लीनने या दरम्यान 4 फोर ठोकले. काशवी गौतमलहीने 20 धावांचं योगदान दिलं. तुनजा कंवर आणि सायली सातघरे या दोघींनी अखेरच्या क्षणी प्रत्येकी 13-13 धावांची खेळी केली. तर कॅप्टन एश्लेग गार्डनर हीने 10 धावा जोडल्या. या व्यतिरिक्त इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गुजरातची 7 बाद 79 अशी स्थिती झाली होती. मात्र अखेरीस तनुजा आणि सायली या दोघींनी केल्या खेळीमुळे गुजरातला 100 पार मजल मारता आली आणि मुंबईसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं.
दरम्यान मुंबईकडून एकूण 6 जणींनी बॉलिंग केली. त्यापैकी डेब्यूटंट पारुनिका सिसोदीया हीचा अपवाद वगळता इतर सर्वांनी विकेट घेण्यात यश मिळवलंय. हॅली मॅथ्यूज हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नॅट सायव्हर ब्रंट आणि अमेलिया केर या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर शबनीम इस्माईल आणि अमनज्योत कौर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली आणि गुजरातला गुंडाळण्यात योगदान दिलं.
गुजरातचं 120 धावावंर पॅकअप
Innings Break❗
Determined effort from #MI restricts the home side to 120. 👏👏
Stay tuned for the chase ⌛
Scorecard ▶ https://t.co/aczhtPyoET#TATAWPL | #GGvMI pic.twitter.com/fNFxShAm2m
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 18, 2025
गुजरात जायंट्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : ॲशले गार्डनर (कॅप्टन), लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (विकेटरीपर), दयालन हेमलता, हर्लीन देओल, डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, काशवी गौतम आणि प्रिया मिश्रा.
मुंबई इंडियन्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, जी कामिलिनी , अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल आणि पारुनिका सिसोदिया.
