
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. कारण यंदाचं चौथं वर्ष असून असून आयपीएलप्रमाणे दर तीन वर्षांनी या स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया असेल असं सांगितलं जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार मेगा लिलाव प्रक्रिया पुढच्या महिन्यात म्हणजेच 26 किंवा 27 ताखरेला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही तारीख 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान दिली होती. मात्र आता या तारखेत बदल करत 26 किंना 27 नोव्हेंबर केली आहे. एकाच दिवशी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडेल असं सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये मेगा लिलाव होईल असं सांगण्यात येत आहे. यंदा नव्या संघाची एन्ट्री होईल अशी चर्चा होती. मात्र तसं होताना दिसत नाही. त्यामुळे चौथ्या पर्वातही पाच संघच मैदानात उतरतील. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्स, दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, लिलावाची एक तारीख अजूनही निश्चित केलेली नाही. पण लिलाव प्रक्रिया एकाच दिवसात पार पडेल असं सांगण्यात येत आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एकूण 5 संघ आहेत. यासाठी फार काही वेळ लागणार नाही. एकाच दिवसात पाचही संघाचे स्कॉड निश्चित केले जातील. जवळपास 90 खेळाडू या मेगा लिलावत भाग घेतील. पण अधिकांश संघ खेळाडू रिटेन करतील असंच चित्र दिसत आहे. सर्व 5 फ्रेंचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी 5 नोव्हेंबरपर्यंत सोपवायची आहे.
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या रिटेन्शन बाबतचे नियम जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्येक संघाला लिलावासाठी 15 कोटींची रक्कम मिळणार आहे. यात पहिल्या स्थानावर असलेल्या खेळाडूला 3.5 कोटी, दुसऱ्या स्थानावरील खेळाडूला 2.5 कोटी, तिसऱ्या स्थानावरील खेळाडूला 1.75 कोटी, चौथ्या स्थानावरील खेळाडूला 1 कोटी आणि पाचव्या स्थानावरील खेळाडूला 50 लाख रुपये मिळतील. म्हणजेच पाच खेळाडू रिटेन केले तर 9.25 कोटी खर्च होतील. इतर खेळाडू घेण्यासाठी फ्रेंचायझीकडे 5.75 कोटी रुपये उरतील. आता फ्रेंचायझी कोणते प्लेयर्स रिटेन करते आणि कोणाला रिलीज करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यात लिलावात पहिल्याचा राइट टू मॅच कार्डही वापरता येणार आहे.