
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना हा रविवारी 2 नोव्हेंबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. महामुकाबल्यात यजमान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघ वर्ल्ड कप ट्रॉफीपासून फक्त 1 पाऊल दूर आहेत. मात्र दोघांपैकी कोणत्या एका संघाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तर एका संघाला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. तर अंतिम सामन्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत कशी कामगिरी केलीय? तसेच दोघांपैकी कोण वरचढ आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिल्याच झटक्यात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताची फायनलमध्ये पोहचण्याची यंदाची तिसरी वेळ आहे. भारताचं...