AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ T20I : भारताची वर्ल्ड कपआधी ‘कसोटी’, न्यूझीलंड विरुद्ध लागणार कस, पाहा वेळापत्रक

India vs New Zealand T20i Series 2026 Schedule : टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेनंतर आता टी 20i सीरिजमध्ये एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मालिकेत उभयसंघात एकूण 5 सामने होणार आहेत.

IND vs NZ T20I : भारताची वर्ल्ड कपआधी 'कसोटी', न्यूझीलंड विरुद्ध लागणार कस, पाहा वेळापत्रक
India vs New Zealand T20i Series 2026Image Credit source: Bcci and Suryakumar Yadav X Account
| Updated on: Jan 19, 2026 | 11:38 PM
Share

यजमान न्यूझीलंडने भारतीय संघाचा 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवला. न्यूझीलंडने 18 जानेवारीला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतावर मात केली. न्यूझीलंडने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारताला 41 धावांनी पराभूत करत सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकला. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. न्यूझीलंडने यासह अनेक दशकांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला. न्यूझीलंडने भारतात एकदिवसीय जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तर शुबमन गिल कर्णधार म्हणून मायदेशतील पहिल्याच एकदिवसीय मालिकेत अपयशी ठरला.

त्यानंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचं आयोजन 21 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटची मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. मात्र भारताचा या मालिकेत चांगलाच कस लागणा आहे. न्यूझीलंडने भारताला एकदिवसीय मालिकेत पराभत केल्याने त्यांचा विश्वास दुणावलेला आहे. तर भारतासमोर वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या मालिकेत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे. अशात चाहत्यांना या मालिकेत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.