WTC Final Weather Update : आज किती ओव्हर्सचा खेळ होणार, पाऊस पडणार का, हवामान कसं असणार? वाचा हा रिपोर्ट

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 18, 2021 | 9:14 AM

WTC Final 2021 Southampton Weather Forecast : वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी साउथॅम्प्टनमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. या पावसाचा आजपासून सुरू होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यावर कसा आणि किती परिणाम परिणाम पडेल, हे आता आपण पाहुयात...

WTC Final Weather Update : आज किती ओव्हर्सचा खेळ होणार, पाऊस पडणार का, हवामान कसं असणार? वाचा हा रिपोर्ट
WTC Final 2021

Follow us on

WTC Final Weather Update : जेवणात मिठाचा खडा लागल्यावर आपण अपसेट होतो. जगभरातल्या क्रिकेट रसिकांचा आज असाच मूड असणार आहे.त्याचं कारण म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी साउथॅम्प्टनमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. या पावसाचा आजपासून सुरू होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यावर कसा आणि किती परिणाम परिणाम पडेल, हे आता आपण पाहुयात… (WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand WTC )

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जून ते 22 जून दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. परंतु या पाच दिवसांपैकी चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच जोरदार वादळी वारं देखी वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 21 जून सोडता इतर चारही दिवस खेळात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. आपण न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या मॅच वेळीदेखील पावसाचा व्यत्यय पाहिला होता. तसाच व्यत्यय या सामन्यात देखील येऊ शकतो असा अंदाज आहे.

आज साऊथॅम्प्टनमध्ये जोरदार पाऊस पडला तर कोणालाही आश्चर्य वाटायला नको. इंग्लंडमध्ये पाऊस सुरू व्हायला आणि बंद व्हायला वेळ लागत नाही. पाऊस कधीही येऊ शकतो आणि थांबू शकतो. जर पाऊस आला तर दोन किंवा तीन तासांता सामन्यावर परिणाम होऊ शकतो. याचाच अर्थ असा की 90 ओव्हर्सऐवजी 60 किंवा 70 ओव्हर्सचा खेळ आज होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. आता अडीच वाजता टॉस होईल आणि ठीक तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याच वेळेस पाऊस येतो अन यात की कोणत्याही व्यक्तीशी व्यक्त याशिवाय 90 वरचा खेळ पार पडणार हे पाहावे लागेल.

(WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand WTC)

हे ही वाचा :

WTC Final: पितृशोक असतानाही सिराजने ऐतिहासिक विजय मिळवून दिला, विराटने WTC फायनल बाहेर बसवलं!

IND vs NZ, WTC 2021 Match Prediction : विश्वविजेतेपदाची ‘कसोटी’, सामन्याचं काय चित्र असेल, विराट की केन? कोण कुणावर भारी? वाचा मॅच प्रेडिक्शन

WTC final Team India Squad : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी विराटसेनेची घोषणा, 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश?

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI