WTC Final: पितृशोक असतानाही सिराजने ऐतिहासिक विजय मिळवून दिला, विराटने WTC फायनल बाहेर बसवलं!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळालेली नाही. कर्णधार विराट कोहलीने त्याला बॅकबेंचवर बसण्याचा निर्णय घेतलाय. (WTC Fianl 2021 Mohammed Siraj not Selected Final indian Squad India vs New Zealand)

WTC Final: पितृशोक असतानाही सिराजने ऐतिहासिक विजय मिळवून दिला, विराटने WTC फायनल बाहेर बसवलं!
विराट कोहली आणि मोहम्मद सिराज
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 7:51 AM

मुंबई :  वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी (WTC Fianl 2021) भारतीय संघानं प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं आहे. याचमुळे इशांत शर्मा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळालीय. तर फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनाही आपल्या फिरकीची कमाल दाखवण्याची संधी चालून आहे. असं पहिल्या वेळेला झालेलं आहे जेव्हा इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे पाचही जणं एकाचवेळी मैदानावर उतरणार आहेत. (WTC Fianl 2021 Mohammed Siraj not Selected Final indian Squad India vs New Zealand)

आतापर्यंत हे पाचजणही एकाच सामन्यात एकत्र खेळले नव्हते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या वडिलांचे निधन झालेला असताना देखील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवून भारतीयांचं ऑस्ट्रेलियाच्या भूमीत त्यांनाच पाणी पाजायचं स्वप्न साकार केलं, त्या मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. कर्णधार विराट कोहलीने त्याला बॅकबेंचवर बसण्याचा निर्णय घेतलाय.

जन्मदाता बाप गेला तरीही तो लढला, भिडला आणि जिंकला!

मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पदार्पण केलं होतं. नुसतं पदार्पणच केलं नव्हतं तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीत जाऊन त्यांनाच पराभूत करणाऱ्या महानायकांमध्ये मोहम्मद सिराज देखील होता. त्यानं ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना माघारी धाडून भारताचा विजय रस्ता सुकर केला होता. वास्तविक त्याला या दौऱ्यात वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मालिका सुरू होण्याअगोदरच त्याच्या वडिलांचं निधन झालं. जन्मदाता बाप त्याला सोडून कायमचा निघून गेला होता. त्याला वडिलांच्या निधनाचा मोठा धक्का बसला. परंतु कोरोना संसर्ग चालू असल्याने सिराद अंतिम संस्काराला उपस्थित राहू शकला नाही. अशा काळात विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी सिराजला धीर दिला. देशासाठी खेळण्याचं स्वप्न दाखवलं. त्याच्या स्वप्नांमध्ये जान भरली. सिराजचाही आत्मविश्वास दुणावला. त्याने कमाल केली. विराट आणि रवीने दाखवलेलं स्वप्न सिराजने सत्यात उतरवलं.

सिराजचं स्वप्न अधुरं

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा इथून पुढची 100 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बोलबाला असेल त्या कसोटी दौऱ्यात सिराजने उत्तम कामगिरी करुन देशाचं नाव रोशन केलं. आतही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये त्याच्या बोलिंगची जादू बघायला मिळणार, म्हणून सगळे जणं आनंदी होते. मात्र इंग्लंडमधील वातावरण आणि प्लेईंग कंडिशन पाहता अंतिम सामन्यात सहा बॅट्समन आणि पाच गोलंदाज (अष्टपैलू अश्विन आणि जाडेजा) यांच्या साथीने उतरण्याचा विराट कोहलीने निर्णय घेतला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याचं सिराजचं स्वप्न अधुरं राहणार आहे.

(WTC Fianl 2021 Mohammed Siraj not Selected Final indian Squad India vs New Zealand)

हे ही वाचा :

IND vs NZ, WTC 2021 Match Prediction : विश्वविजेतेपदाची ‘कसोटी’, सामन्याचं काय चित्र असेल, विराट की केन? कोण कुणावर भारी? वाचा मॅच प्रेडिक्शन

WTC final Team India Squad : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी विराटसेनेची घोषणा, 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश?

WTC अंतिम सामन्याचा निकाल काय असेल?, गांगुली म्हणतो, ‘या’ दोन खेळांडूवर सगळं अवलंबून

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.