WTC Final 2023 | विराट कोहली याचा धमाका, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा विक्रम

| Updated on: Jun 08, 2023 | 11:21 PM

विराट कोहली याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विराट टीम इंडियाला सावरेल, असं वाटत होतं. मात्र विराटने निराशा केली.

WTC Final 2023 | विराट कोहली याचा धमाका, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा विक्रम
Image Credit source: AP
Follow us on

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात बॅटिंग करताना 38 ओव्हरमध्ये 5 बाद 151 धावा केल्या आहेत. टीम अजून 318 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर ऑलआऊट केलं. आता तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांकडून चांगल्या आणि मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडियाची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल चांगली सुरुवात देतील, अशी आशा होती. मात्र रोहित शर्मा आणि त्यानंतर शुबमन गिल झटपट आऊट झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या दोघांनीही निराशा केली. दोघेही प्रत्येकी 14 धावा केल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी 71 धावांची भागीदारी केली. मात्र नेथन लायनने रविंद्र जडेजाला आऊट करत ही जोडी फोडली.

टीम इंडियाच्या सलामी जोडी आणि मिडल ऑर्डर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. त्यामुळे आता तिसरा दिवस निर्णायक ठरणार आहे. मात्र त्याआधी विराटच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. विराट कोहली याने अवघ्या 14 धावांच्या खेळीसह विक्रम केला आहे.

हे सुद्धा वाचा

विराट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावावर WTC मध्ये 3 शतक आणि 8 अर्धशतकांसह 1 हजार 817 धावांची नोंद आहे. विराटने यासह टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला मागे टाकलं आहे. रोहितने 6 शतक आणि 4 अर्धशतकांसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 1 हजार 809 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 121.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 469 धावांवर धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी शतकं ठोकली. हेडने 163 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथ याने 121 धावा केल्या. स्टीव्हनचं भारत विरुद्धचं एकूण नववं कसोटी शतक ठरलं.

या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन दिली नाही. एलेक्स कॅरी याने 48, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेन याने 26 धावा जोडल्या. उस्मान ख्वाजा याला भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर स्कॉट बॉलंड 1 धावेवर नाबाद राहिला.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.