AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wtc Final 2023 AUS vs IND Day 3 | तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी

Wtc Final 2023 Day 3 Stumps | तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलंय. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला झटके दिले.

Wtc Final 2023 AUS vs IND Day 3 | तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी
| Updated on: Jun 09, 2023 | 11:10 PM
Share

लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनल सामन्यातील तिसफ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बॅटिंग करताना खेळ संपेपर्यंत 44 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या डावात 173 धावांची आघाडी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे आता एकूण 296 धावांची आघाडी आहे.  ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा 13, डेव्हिड वॉर्नर 1, स्टीव्हन स्मिथ 34 आणि ट्रेव्हिस हेड याने 18 धावा केल्या.

तर मार्नस लाबुशेन याने नाबाद 41 आणि कॅमरुन ग्रीन 7 धावांवर नाबाद परतले. टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा याने 2 तर मोहम्मद सिराज आणि उमेश यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. त्याआधी टीम इंडियाने अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या दोघांच्या शतकी भागीदारी आणि वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर ऑलआऊट 296 धावा केल्या. या दरम्यान रहाणेने कसोटीतील 5 हजार धावांचा टप्पाही पार केला.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 296 धावांवर रोखल्याने त्यांना दुसऱ्या डावात 173 धावांची मोठी आणि भक्कम आघाडी मिळाली. आता तिसऱ्या दिवसापर्यंत कांगारुंनी 123 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 296 धावांनी पुढे आहे. आता चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झटपट आऊट करत रोखण्याचं आव्हान असणार आहे.

टीम इंडियाची पहिली इनिंग

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या युवा आणि अनुभवी फलंदाजांनी हिरमोड केला. हे चौघेही झटपट आऊट झाले. रोहित शर्मा 15 धावांवर आऊट झाला. तर त्यापाठोपाठ शुबमन गिल याने 13 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आयपीएलमध्ये हिरो ठरलेल्या शुबमनने घोर निराशा केली.

सलामी जोडी झटपट आऊट झाल्याने टीम इंडिया आता अडचणीत सापडली. सलामी जोडी आऊट झाल्याने टीम इंडियाची 2 बाद 30 अशी स्थिती झाली. तर दुसऱ्या सत्रातील खेळ संपला तोवर भारताने 10 ओव्हरमध्ये 2 बाद 37 धावा केल्या. तिसऱ्या सत्रात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या जोडीकडून अपेक्षा होत्या. मात्र या दोघांनीही निराशा केली. पुजारा आणि विराट दोघेही प्रत्येकी 14 धावा करुन माघारी परतले.

त्यानंतर रहाणे आणि रविंद्र जडेजा या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 100 बॉलमध्ये 71 रन्सची पार्टनरशीप केली. या 71 धावांच्या भागीदारीत जडेजा याने 48 तर रहाणे याने 15 धावांचं योगदान दिलं.

त्यानंतर जडेजा 48 धावांवर आऊट झाला. त्यानंतर केएस भरत मैदानात आला. केएस आणि रहाणे दुसऱ्या दिवशी नाबाद परतले. मात्र तिसऱ्याच दिवशी मैदानात येताच दुसऱ्या बॉलवर केएस आऊट झाला.

शार्दुल-रहाणे जोडीने सावरलं

केएसनंतर शार्दुल मैदानात आला. शार्दुलने याआधीही ओव्हलवर अर्धशतक ठोकलंय. त्यामुळे शार्दुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. शार्दुलने निराशा केली नाही. शार्दुलने रहाणेला चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. रहाणेने 129 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 89 धावांची खेळी केली.

रहाणे आऊट झाल्यानंतर ठाकुरने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. ठाकुरने काही फटके मारुन आपलं चौथं कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर उमेश यादव आऊट 5 धावांवर आऊट झाला. अर्धशतक केल्यानंतर शार्दुल ठाकुरच्या शानदार खेळीचा द एन्ड झाला. शार्दुलने 109 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. शार्दुलनंतर शमी 13 धावांवर आऊट झाला आणि टीम इंडिया ऑलआऊट झाली.

ऑस्ट्रेलियाकडून बॉलिंग केलेल्या पाचच्या पाच गोलंदाजांनी विकेट घेतल्या. पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. बोलँड, मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर नेथन लायन याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 121.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 469 धावांवर धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी शतकं ठोकली. हेडने 163 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथ याने 121 धावा केल्या. स्टीव्हनचं भारत विरुद्धचं एकूण नववं कसोटी शतक ठरलं.

या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन दिली नाही. एलेक्स कॅरी याने 48, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेन याने 26 धावा जोडल्या. उस्मान ख्वाजा याला भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर स्कॉट बॉलंड 1 धावेवर नाबाद राहिला.

सामन्याचा लेखाजोखा

ऑस्ट्रेलिया : 469&123-4 (296 धावांची आघाडी) टीम इंडिया : 296

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष