Virat On Smith | विराट कोहली स्टीव्ह स्मिथला सर्वांसमोर थेटच बोलला

Wtc Final 2023 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची लढाई सुरु आहे. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने स्टीव्हन स्मिथला चांगलंच सुनावलंय.

Virat On Smith |  विराट कोहली स्टीव्ह स्मिथला सर्वांसमोर थेटच बोलला
| Updated on: Jun 10, 2023 | 9:49 PM

लंडन | विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघे सध्याच्या घडीचे आघाडीचे फलंदाज आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमध्ये टेस्ट वर्ल्ड कप जिंकण्यासाठी चढाओढ सुरु आहे. हा महाअंतिम सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. स्टीव्हन स्मिथ याने पहिल्या डावात शानदार शतक ठोकलं. मात्र स्मिथ दुसऱ्या डावात पहिल्या डावाच्या तुलनेत लवकर आऊट झाला. या सामन्यादरम्यान विराट कोहली याने ऑन कॅमेरा स्टीव्हन स्मिथ याला तोंडावर सुनावलंय.

स्मिथ याने पहिल्या डावात 121 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात स्टीव्हने 34 धावा केल्या. स्टीव्ह दुसऱ्या डावात ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कारण स्टीव्ह खराब शॉट मारत आऊट झाला.

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर आणि स्टीव्हन स्मिथ बोलत होते. तेव्हा विराट तिथे गेला. विराट स्टीव्हनला “खराब शॉट” असं म्हणाला. लँगरने हा किस्सा चौथ्या दिवशी कॉमेंट्रीदरम्यान सांगितला. “विराटच्या जागी दुसरा कोणी असता तर स्मिथला फरक पडला नसता. मात्र तो विराट होता. त्यामुळे स्मिथने ऐकून घेतलं आणि त्याने सांगितलेलं अचूक असल्याचं स्मिथने मान्य केलं”, असंही लँगरने म्हटलं.

स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहलीचा किस्सा

 

स्मिथ असा आऊट झाला

स्मिथने रविंद्र जडेजा याच्या बॉलिंगवर क्रीजमधून पुढे येत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. मात्र त्यानंतरही स्मिथने फटका मारला. फटका नीट न बसल्याने बॉल हवेत उडाला आणि शार्दुलने अप्रतिम कॅच पकडला.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.