Wtc Final 2023 AUS vs IND | Shubman Gill Out की Not Out?

Shubman Gill Out Wtc Final 2023 | अंपायरने चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचा आरोप हा नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कॅमरुन ग्रीनने घेतलेला कॅच हा अर्धवट असल्याचं म्हटलं जात आहे. व्हीडिओ पाहून तुम्हीच सांगा गिल आऊट की नॉट आऊट?

Wtc Final 2023 AUS vs IND | Shubman Gill Out की Not Out?
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 8:55 PM

लंडन |र्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यातील चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 84.3 ओव्हरमध्ये 8 बाद 270 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या डावात एकूण 173 धावांची मोठी आघाडी होती. त्यामुळे टीम इंडियाला आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची चांदीची गदा जिंकण्यासाठी 444 धावांचे आव्हान पूर्ण करावे लागणार आहे. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली. रोहित-शुबमन या जोडीने आश्वासक सुरुवात केली. दोघांनी 7 ओव्हरपर्यंत 41 धावा जोडल्या.

सामन्यातील चौथ्या डावातील आठवी ओव्हर स्कॉट बोलंड टाकायला आला. बोलंडच्या पहिल्या बॉलवर युवा शुबमन गिल याने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅटला कट लागून बॉल उंचपुऱ्या कॅमरुन ग्रीनच्या दिशेने गेला. ग्रीनने गिलचा कॅच घेतला. मात्र या दरम्यान ग्रीनने घेतलेला कॅच हा अर्धवट असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलला जमिनीला स्पर्श झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणनं आहे. मात्र अंपायरने बाद दिल्याने शुबमन गिल याला माघारी परतावं लागलं.

शुबमन आऊट की नॉट आऊट?

अंपायरने शुबमनला आऊट दिल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय. शुबमन गिल हा स्पष्ट नॉट आऊट असल्याचं दिसतंय. तर टेक्नोललॉजी असतानाही अंपायर थेट निर्णय का देतात, असे संतप्त आणि आक्रमक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. या निर्णयामुळे पंचांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान शुबमन गिल याने दुसऱ्या डावात 19 बॉलमध्ये 94.74 च्या स्ट्राईक रेटने 2 चौकारांच्या मदतीने 18 धावांची खेळी केली. तर त्याआधी पहिल्या डावामध्ये शुबमन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. शुबमनला पहिल्या इनिंगमध्ये 13 धावाच करता आल्या. दरम्यान आता टीम इंडियाला 444 धावांचं आव्हान पार करण्यासाठी उर्वरित फलंदाजांना जबाबादारीने मोठी खेळी करावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.