WTC Final 2023 | टीम इंडियाला मोठा धोका, कॅप्टन रोहित शर्मा अलर्ट

World Test Championship Final 2023 | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मुकाबल्याला आता अवघे काही तास बाकी आहेत. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे. जाणून घ्या टीम इंडियाचं टेन्शन दुप्पटीने वाढवणारी बातमी.

WTC Final 2023 | टीम इंडियाला मोठा धोका, कॅप्टन रोहित शर्मा अलर्ट
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 7:06 PM

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील द ओव्हल इथे टेस्ट वर्ल्ड कप महाअंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 7 ते 11 जून दरम्यान करण्यात आलं आहे. या महामुकाबल्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. दोन्ही संघ लंडनला पोहचले असून जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याची ही एकूण आणि सलग दुसरी वेळ आहे. टीम इंडियाला 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे यंदा कोणत्या परिस्थितीत विजयी होण्याचा मानस टीम इंडियाचा आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला धोका आहे.

टीम इंडियासाठी हा महाअंतिम सामना प्रतिष्ठेचा आहेच. सोबतच टीम इंडियासमोर कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा महामुकाबला कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. कारण टीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये ताज्या आकडेवारीनुसार 121 पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया 116 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियाने हा सामना गमावला तर ऑस्ट्रेलिया बरोबरी साधेल. ऑस्ट्रेलियाचा विजय झाल्यास त्यांचे 119 पॉइंट्स होतील. तर टीम इंडियाला 2 पॉइंट्सचं नुकसान होईल.

हे सुद्धा वाचा

तर ऑस्ट्रेलिया 1 नंबर!

दरम्यान ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर इंग्लंड विरुद्ध प्रतिष्ठेची असेलली एशेज सीरिज खेळणार आहे. या मालिकेला 16 जूनपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाला पहिलाच सामना जिंकून नंबर 1 होण्याची संधी आहे. मात्र ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान कायम राखण्यातही थोडं आव्हानात्मक असणार आहे. कारण त्यासाठी ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्ध मालिका जिंकावी लागेल किंवा 2 पेक्षा जास्त सामन्यात पराभव होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

तर टीम इंडियाला अव्वल स्थान राखण्यासाठी हा फायनल मुकाबला जिंकावं लागेल. टीम इंडिया जिंकली की ऑस्ट्रेलियाचं अव्वल स्थानी पोहण्याचं स्वप्न अवघड होईल. कारण भारताच्या विजयानंतर कांगारुंना पहिल्या स्थानी येण्यासाठी इंग्लंड विरुद्ध एशेज सीरिज जिंकावी लागेल, जे आव्हानात्मक असेल.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.