WTC Final 2023 Team India Playing 11 | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महाअंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची थोड्याच वेळात घोषणा

World Test Champinship Final 2023 IND vs AUS | चांदीच्या गदेसाठी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 5 दिवस महाअंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे.

WTC Final 2023 Team India Playing 11 | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महाअंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची थोड्याच वेळात घोषणा
| Updated on: Jun 06, 2023 | 6:04 PM

लंडन | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये आमनेसामने भिडणार आहेत. हा महाअंतिम सामना लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माची आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे रोहित शर्मा टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात आणि 2011 नंतर पहिल्यांदाच आयसीसी वर्ल्ड कप जिंकऊन देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या महत्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलेली नाही.

प्लेइंग इलेव्हन केव्हा जाहीर होणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया या महाअंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांनी संघ जाहीर केलाय. मात्र अंतिम 11 मध्ये कोणते खेळाडू असणार, हा तिढा अजूनही कायम आहे. आता सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघ अंतिम 11 खेळाडूंची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र अजून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

खेळपट्टी कशी आहे?

ओव्हलच्या खेळपट्टीची खूपच चर्चा रंगली आहे. खेळपट्टीचा फोटो व्हारल झाला आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू आणि समालोचक दिनेश कार्तिकने खेळपट्टीचे 3 फोटो शेअर केले आहेत. “सामन्याला 2 दिवस बाकी आहेत आणि खेळपट्टी अशी दिसतेय”, असं म्हणत कार्तिकने हे फोटो शेअर केले आहेत.

दिनेश कार्तिक याचं ट्विट

आकडेवारी कोणाच्या बाजूने?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 106 सामन्यांपैकी 44 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 32 सामन्यात कांगारुंचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही संघांना 29 सामने ड्रॉ करण्यात यश आले आहे. तर 1 सामना हा टाय झालाय.

ऑस्ट्रेलियाने या 44 पैकी 30 सामने घरच्या मैदानात जिंकले आहेत. तर 14 सामने ऑस्ट्रेलियाबाहेर जिंकले आहेत. तर भारताने 23 देशात आणि 9 परदेशात सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया भारतावर वरचढ आहे.

टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संभावित प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मना ख्वाजा, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ट्रेव्हिस हेड, एलेक्स कॅरी, कॅमरुन ग्रीन, मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलँड आणि नाथन लॉयन.