Yash Dhull: यश धुलने मैदानाबाहेर लगावलेला ‘हा’ सिक्सर नक्की पाहा, तुम्ही सुद्धा म्हणाल What a hit, पाहा VIDEO

| Updated on: Feb 03, 2022 | 2:03 PM

ऑस्ट्रेलियन (Australia) गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना यशने दहा चौकार आणि एक षटकार लगावला. यशने त्याच्या शतकी खेळीत फक्त एक षटकार लगावला पण सामन्यातील तो सर्वात कडक षटकार ठरला.

Yash Dhull:  यश धुलने मैदानाबाहेर लगावलेला हा सिक्सर नक्की पाहा, तुम्ही सुद्धा म्हणाल What a hit, पाहा VIDEO
Follow us on

Under 19 world cup: भारताने काल सलग चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या (Under 19 world cup) अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताला वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती कॅप्टन यश धुलने. (Yash Dhull) त्याच्या बहारदार फलंदाजीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियावर सहज विजय संपादन केला. यश धुल संघ अडचणीत असताना फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. त्याने वेळेची आणि संघाची गरज ओळखून आपल्यातील असामान्य प्रतिभा दाखवून दिली. दिल्लीच्या या युवा फलंदाजाने 110 चेंडूत 110 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन (Australia) गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना यशने दहा चौकार आणि एक षटकार लगावला. यशने त्याच्या शतकी खेळीत फक्त एक षटकार लगावला पण सामन्यातील तो सर्वात कडक षटकार ठरला.

यशच्या या षटकाराने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले व त्यात भविष्याची चुणूक दिसली. समोर ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंड टॉम व्हिटनी गोलंदाजी करत होता. त्याने थोडा शॉर्ट पिच चेंडू टाकला. यशने लगेच स्टेप आऊट होऊन लाँग ऑन बाऊंड्रीवरुन त्या चेंडूला मैदानाबाहेर पाठवलं. यश धुलच्या या जबरदस्त खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतासमोर आता इंग्लंडच आव्हान असणार आहे.

भारताची आतापर्यंतची स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर भारतच जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे इंग्लंडविरोधात भारताचं पारड जड आहे. यश धुलच्या त्या सिक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहे. ‘भाई ने कांगारुंना विना सर्फ एक्सेल धुवून टाकलं’

संबंधित बातम्या:

U19 World Cup: मायकल वॉनला दिसला भारताच्या अंडर 19 टीममध्ये असामान्य खेळाडू, म्हणाला….
Shardul Thakur: ‘हो, मी खराखुरा ऑलराऊंडर’, शार्दुल ठाकूरने हार्दिक पंड्या बाबतही केलं वक्तव्य
U19 World Cup: सेमीफायनलमधला भारताच्या विजयाचा हिरो कॅप्टन यश धुलने विराट कोहलीला टाकलं मागे