यशस्वी जयस्वाल आणि गिलची कमकुवत बाजू श्रीलंकेच्या केंद्रस्थानी, या चार गोलंदाजांना वापरणार

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. फिरकीविरुद्ध भारतीय खेळाडूंची कमकुवत बाजू उघड झाली आहे. असं असताना कर्णधार गिल आणि यशस्वी जयस्वाल यांची दुखरी बाजू श्रीलंकेने बरोबर पकडली आहे.

यशस्वी जयस्वाल आणि गिलची कमकुवत बाजू श्रीलंकेच्या केंद्रस्थानी, या चार गोलंदाजांना वापरणार
यशस्वी जयस्वाल आणि गिलची कमकुवत बाजू श्रीलंकेच्या केंद्रस्थानी, या चार गोलंदाजांना वापरणार
Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 13, 2026 | 5:25 PM

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या बऱ्याच उणीवा समोर आल्या आहेत. त्यामुळे कसोटी मालिका भारतासाठी कठीण पेपर असणार आहे. गेल्या काही वर्षात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना संघर्ष करत आहेत. त्यामुळे श्रीलंकेत फिरकीचा सामना करणं भारतीय फलंदाजांसाठी आव्हान असणार आहे. असं असताना या स्थितीत कर्णधार शुबमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर विश्वास टाकला जात आहे. पण आता त्यांच्या फलंदाजीतही काही उणीवा असल्याचं दिसून आलं आहे. खासकरून श्रीलंकन संघाने हे बरोबर हेरल्याचं दिसत आहे. त्यामुळे श्रीलंकेने गोलंदाज निवडताना रणनिती आखली आहे. डावखुऱ्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना अडचण येत असल्याचं दिसून आलं आहे. श्रीलंकेने कसोटी सामन्याच्या तीन दिवस आधी संघ निवडला. त्यात त्यांनी योग्य पर्याय निवडले आहेत.

श्रीलंकेने आपल्या संघात चार प्रमुख फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाज निवडले आहे. यात दोन वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकी गोलंदाज हे डावखुरे आहेत. वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो यापूर्वी कसोटी सामने खेळला आहे. पण फक्त एका कसोटीसाठी दिलशान मदुशंका याला संघात सहभागी केली आहे. फिरकीपटू प्रभात जयसूर्या याची निवड होणं सहाजिकच होतं. पण तीन कसोटी सामने खेळलेल्या डावखुरा फिरकीपटू सोनल दिनुषा याचीही संघात निवड केली आहे. ही रणनिती श्रीलंकेच्या पथ्यावर पडू शकते. त्याचं कारणही तसंच आहे.

सलामीवीर यशस्वी जयस्वाल डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीचा सामना करताना अडचणीत आल्याचं दिसून आलं. सराव सामन्यात विश्वा फर्नांडोने त्याची विकेट काढली होती. यशस्वी जयस्वालला कसोटी कारकि‍र्दीत 17 वेळा डावखुऱ्या गोलंदाजांनी बाद केलं आहे. त्यात 8 वेळा डावखुरा फिरकीपटूंनी त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर त्याची सरासरी 8.77 आणि डावखुऱ्या फिरकीपटूसमोर त्याची सरासरी ही 39 ची आहे.

दुसरीकडे, कर्णधार गिल फिरकीचा सामना करण्यास सक्षम आहे. पण डावखुऱ्या फिरकीपुढे फिका पडताना दिसतो. गिलला 20 वेळा डावखुऱ्या गोलंदाजांनाी तंबूचा रस्ता दाखवला आहे. यात फक्त सहा वेळा वेगवान गोलंदाजांनी, तर 14 वेळा फिरकी गोलंदाजाने बाद केलं आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिलसाठी धोक्याची घंटा आहे. या कमकुवत बाजूची अभ्यास करूनच श्रीलंकन संघ प्लेइंग 11 निवडणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us