… मी तुझ्यासारखी असती! यशस्वी जयस्वाल समोर अनन्या पांडेच्या मनातलं आलं ओठावर, पाहा Video

टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे एका स्पोर्ट्स कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी दोघांमध्ये प्रश्नोत्तरांचा तास पार पडला. मेंटल हेल्थबाबत या कार्यक्रमात अनन्याने प्रश्न विचारला होता. त्यावर जयस्वालने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

... मी तुझ्यासारखी असती! यशस्वी जयस्वाल समोर अनन्या पांडेच्या मनातलं आलं ओठावर, पाहा Video
| Updated on: Feb 03, 2025 | 5:25 PM

यशस्वी जयस्वाल हा भारतीय क्रिकेटचा उभरता तारा आहे. 2024 या वर्षात त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. यशस्वी जयस्वाल टीम इंडियासाठी एक मॅन विनर खेळाडू म्हणून उदयास आला आहे. त्याच्याकडून आता टीम इंडियाला फार अपेक्षा आहेत. टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडल्यानंतर यशस्वी जयस्वाल वनडे क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची संघात निवड केली आहे. या मालिकेत यशस्वी जयस्वाल वनडेत पदार्पण करताना दिसू शकतो. असं असताना यशस्वी जयस्वालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्पोर्ट्स कार्यक्रमात यशस्वी जयस्वाल बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसह दिसला. या कार्यक्रमात यशस्वी जयस्वाल आणि अनन्या पांडे यांच्यात मेंटल हेल्थवर खास चर्चा झाली. व्हायर झालेल्या व्हिडीओत अनन्या पांडेने यशस्वी जयस्वालला विचारलं की, ‘तुम्ही वाचलेले असे काही आहे का ज्यामुळे तुम्ही खेळापूर्वी किंवा सराव सत्रापूर्वी तुमचे लक्ष विचलित केले असेल किंवा असे काही?’ या प्रश्नाला उत्तर देताना यशस्वी जयस्वाल म्हणाला की, ‘नाही, मला तसं काही वाटत नाही.’ यानंतर अनन्या म्हणाली, ‘कदाचित मी तुझ्यासारखी असते, मला विचारही करायचा नाही.’

अनन्या पांडेने मधेच असं अडवल्यानंतर यशस्वी जयस्वाल म्हणाला, ‘माझा फक्त एक प्रयत्न असतो की माझ्या नियंत्रणात काय आहे. मी काय करू शकतो. मी त्याच्यावर लक्ष केंद्रीत करू शकतो. मी माझ्या विचारांवर काम करू शकतो. माझं सर्व लक्ष हे एकाच गोष्टीवर असतं की मला काय करायचं आहे.’ यानंतर यशस्वी जयस्वाल सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरही व्यक्त झाला. ‘कोणी काही म्हणू देत. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करतो, सोशल मीडियावर लोकांना त्यांची बाजू मांडण्याचा हक्क आहे. मी त्यांचा आदर करतो. पण त्यांचं म्हणणं माझ्यावर वरचढ ठरू देत नाही.’

यशस्वी जयस्वालची इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. 23 वर्षीय यशस्वी जयस्वाल कसोटी आणि टी20 सामने खेळला आहे. आता वनडे फॉर्मेटमध्येही यशस्वी जयस्वाल संघात जागा तयार करण्यासाठी सज्ज झाला आहे. यशस्वी जयस्वालला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही ते आताच सांगणं कठीण आहे. पण टीम इंडियासाठी बॅकअप ओपनर असेल. ओपनिंगला रोहित शर्मा आणि शुबमन गिलला संधी मिळेल. जर गरज पडली तर यशस्वी जयस्वालला संधी मिळेल.