IND vs WI : सामना सुरु असताना गिलचा अपघात, जयस्वालने पार पाडली डॉक्टरची भूमिका; झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 2 गडी गमवून 318 धावा केल्या आहेत. या सामन्यात एक अपघात घडला आणि काही वेळ सामना थांबवण्याची वेळ आली. नेमकं गिलसोबत काय झालं? जाणून घ्या.

IND vs WI : सामना सुरु असताना गिलचा अपघात, जयस्वालने पार पाडली डॉक्टरची भूमिका; झालं असं की..
IND vs WI : सामना सुरु असताना गिलचा अपघात, जयस्वालने पार पाडली डॉक्टरची भूमिका; झालं असं की..
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 10, 2025 | 8:09 PM

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाने गाजवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने फक्त 2 गडी गमवून 318 धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने जबरदस्त कामगिरी केली. जयस्वालने पुन्हा एकदा फलंदाजीचं कौशल्य दाखवत एक शानदार शतक ठोकले. यशस्वीने 253 चेंडूत 22 चौकार मारत नाबाद 173 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी द्विशतकी खेळी करेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. यशस्वी जयस्वालने साई सुदर्शनसोबत 194 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शनची विकेट पडली आणि शुबमन गिल मैदानात आला. त्यांनी हा खेळ पुढे नेला. पण एक धाव घेताना शुबमन गिलचा अपघात झाला. मग काय यशस्वी जयस्वालने फक्त फलंदाजीच नाही तर डॉक्टरची भूमिकाही पार पाडली. नेमकं काय झालं? की जयस्वालने यशस्वी जयस्वालची तपासणी केली.

पहिल्या दिवसाचा शेवटचा तास सुरु होता आणि 85वं षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज अँडरसन फिलिप आला होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जयस्वालने लेग साईडला मारला. दोन्ही खेळाडू एक धाव घेण्यासाठी धावले. नॉन स्ट्राईकला असलेल्या गिलने क्रिज धाव घेतली. पण विकेटकीपर टेवि इमलाच मधे आला आणि दोघांची टक्कर झाली. हेल्मेट घातलेल्या गिलचं डोकं थेट इमलाच्या छातीवर आदळलं. यावेळी चेंडू देखील गिलच्या खांद्यावर लागला. विचित्र दृष्य पाहून क्रीडाप्रेमींना धक्का बसला. त्यानंतर दोन्ही संघांचा मेडिकल स्टाफ मैदानात पोहोचला.

टक्कर होताच इमलाच मैदानावर आडवा झोपला आणि छाती चोळत होता. तर शुबमन गिलने हेल्मेट काढलं आणि डोकं पकडून बसला. त्यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला. त्यानंतर फिजिओने गिलची तपासणी केली. त्यानंतर जयस्वालच्या अंगात डॉक्टर घुसला. गिलचं कनकशन तपासमी करायची होती. तेव्हा जयस्वालने हे काम हाती घेतलं. गिलच्या डोळ्यासमोर आपली बोट ठेवली आणि विचारलं किती आहेत. ते पाहून गिलला हसू आवरलं नाही. दुसरीकडे, टक्कर लागलेल्या दोन्ही खेळाडूंना फार काही झालं नाही. त्यामुळे खेळ पुन्हा सुरु झाला.