फुकटचा पगार खात आहेस…! नेटकऱ्याने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, खासदार हरभजन सिंगने दिलं थेट उत्तर
माजी क्रिकेटपटू आम आदमी पक्षाचा खासदार असून राज्यसभेवर निवडून गेल आहे. मात्र हरभजन सिंग कधीच राज्यसभेत दिसत नसल्याची ओरड होत असते. आता एका नेटकऱ्यांना फुकटचा पगार खात असल्याची टीका केली आहे. त्यावर हरभजन सिंगने सडेतोड उत्तर दिलं आहे.

क्रिकेटविश्वात नावलौकिक मिळवल्यानंतर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने राजकारणात आपलं नशिब आजमावलं आहे. हरभजन सिंगने 2021 क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हरभजन सिंग आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेला आहे. राज्यसभा खासदार हरभजन सिंगकडून लोकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. हरभजन सिंगही आपल्या माध्यमातून कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. असं सर्व असताना एका युजर्सने हरभजन सिंगवर बोचरी टीका केली आहे. युजर्सने लिहिलं आहे की, ‘राज्यसभेतून निघून जा. आम्ही तुला कधीच बोलताना पाहिलं नाही. करदात्यांच्या पैशांतून फुकटचा पगार खात आहेस.’ या कमेंट्सनंतर आप खासदार हरभजन सिंग चांगलाच संतापला आहे. फुकटच्या पगाराबाबत त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच त्या युजर्सलाही टोचेल असं सुनावलं आहे.
हरभजन सिंगने उत्तर देत सांगितलं की, “भाई, मला मिळणारा सर्व पगार मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होत आहे. फी परवडत नसलेल्या मुलांना याचा फायदा होतो. मी एकही पैसा माझ्यासाठी वापरत नाही. मी सुद्धा तुमच्यासारखा करदात ा आहे. एवढं रागवू नका. तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर मला सांगा मी नक्कीच मदत करेल. तुम्हाला शिष्टाचार शिकवण्याची गरज आहे. ”
Bhai mera sara salary goes for educating kids who can’t afford it not a single penny goes for my own use. and I am also a tax payer like you.. itna gusaa nahi karte.. and if u do wanna get some education let me know I will take care of ur study too.. u need to learn TAMEEZ https://t.co/ThMfMj5ZoT
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 24, 2024
इतकंच काय तर त्या युजर्सची बोलती बंद केली आहे. यापूर्वी एका युजर्सने समालोचनाबाबत वाईट कमेंट केली होती. त्यावरही हरभजन सिंगने खडे बोल सुनावले होते. तसेच एका युजर्सने कानातून रक्त येत असल्याचा फोटो शेअर केला आहे. तसेच पोस्ट करताना लिहिलं की, ‘काही नाही, हरभजन सिंगची शायरी असलेलं समालोचन ऐकलं’ त्यावर हरभजन सिंगनेही मजेशीर उत्तर दिलं आहे. “देवाचे खरंच आभार, दुसरीकडून रक्त निघालं नाही..गॉड ब्लेस यू..तसा फिडबॅक चांगला आहे.”
😂😂😂😂 thank God kahi aur se nahi nikla khoon 😜 God bless uNice feedback though https://t.co/Vl7Q2Vq4AT
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 24, 2024
टी20 वर्ल्डकपमध्ये हरभजन सिंग समालोचन पॅनलमध्ये आहे. पण त्याच्या समालोचनावरून काही जण त्याला ट्रोल करत आहेत.पण हरभजन सिंगच्या उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद झाली आहे. मैदानातील आक्रमक अंदाज आता सोशल मीडियावरही दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढे हरभजनला ट्रोल करताना दहावेळा विचार करावा लागेल.
