‘सिक्सर किंग’ मैदानात परतणार! पब्लिक डिमांडनंतर युवराजचं मोठं पाऊल, म्हणाला, ‘सब ऊपरवाले का लिखा है’

युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केव्हाच रामराम केला आहे. पण आता त्याने पुन्हा खेळपट्टीवर येण्याचे संकेत दिले आहेत. 2011 च्या विश्वचषकाचा हिरो असलेल्या युवराज सिंगने फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा खेळपट्टीवर येण्याचे संकेत देत सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ जारी केला.

'सिक्सर किंग' मैदानात परतणार! पब्लिक डिमांडनंतर युवराजचं मोठं पाऊल, म्हणाला, 'सब ऊपरवाले का लिखा है'
Yuvraj Singh

मुंबई : ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग (Yuvraj Singh) हा टीम इंडियाच्या मोठ्या मॅच विनर्सपैकी एक आहे. बॉल टाईम करायचा असेल अथवा त्यावर जोरदार प्रहार करायचा असेल तर त्याच्या बरोबरीचा दुसरा फलंदाज कोणीच नाही. युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केव्हाच रामराम केला आहे. पण आता त्याने पुन्हा खेळपट्टीवर येण्याचे संकेत दिले आहेत. 2011 च्या विश्वचषकाचा हिरो असलेल्या युवराज सिंगने फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा खेळपट्टीवर येण्याचे संकेत देत सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ जारी केला. (Yuvraj Singh announces his comeback from retirement)

पुन्हा मैदानात उतरण्याच्या युवराजच्या दाव्यामध्ये किती ताकद आहे, हे वेळ आल्यावरच कळेल. युवराजने अपलोड केलेला व्हिडिओ इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या 150 धावांच्या खेळीचा आहे. ‘तेरी मिट्टी’ गाण्यावर एडिट करुन बॅटिंग करतानाचा हा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर स्वत:चा हा व्हिडिओ पोस्ट करताना युवराजने लिहिले आहे की, “तुमचं नशीब देव ठरवतो. जनतेच्या मागणीनुसार मी फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरेन. या भावनेपेक्षा माझ्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही. यासाठी मी सर्वांचा आभारी राहीन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

युवराज सिंगने भारतासाठी 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात 17 शतके आणि 71 अर्धशतकांचा समावेश आहे. युवराज पूर्ण फॉर्ममध्ये असताना त्याला रोखणे प्रतिस्पर्धी संघांसाठी कठीण होते. 11,000 हून अधिक धावा करण्यासोबतच त्याने 148 विकेट्स देखील घेतल्या आहेत, ज्यामध्ये दोन वेळा एकाच डावात 4 विकेट्स आणि एकदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे.

2000 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण

युवराज सिंगने 2000 मध्ये नैरोबी येथे खेळल्या गेलेल्या ICC नॉकआउट स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि पुढील 17 वर्षे तो भारताकडून खेळला. युवराजने भारतासाठी शेवटचा सामना 30 जून 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यानंतर त्याने 2019 मध्ये निवृत्तीची घोषणा केली.

2 नोव्हेंबर रोजी त्याने सोशल मीडियावर अपलोड केलेला व्हिडिओ 2017 मध्ये कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याची 150 धावांची खेळी दाखवतो. युवराजने 127 चेंडूत 21 चौकार आणि 3 षटकारांसह ही खेळी केली होती. या डावात त्याने एमएस धोनीसोबत 256 धावांची भागीदारीही केली होती, या सामन्यात धोनीने 134 धावा केल्या होत्या.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: बटलरचं झंझावती शतक, इंग्लंडची विजयासह सेमी फायनलमध्ये एन्ट्री, श्रीलंका स्पर्धेबाहेर

T20 World Cup 2021: 5 प्रकारचे चेंडू फेकणाऱ्याला संघाबाहेर कसं केलं?, दिग्गज फिरकीपटूचा सवाल

लज्जास्पद! मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्स संतापले

(Yuvraj Singh announces his comeback from retirement)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI