लज्जास्पद! मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्स संतापले

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर मोहम्मद शमीवर अनेक चूकीच्या टीका करण्यात आल्या. यावेळी कर्णधार विराट त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. ज्यानंतर विराटच्या अवघ्या 10 महिन्याच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याच्या धमक्या विराटला मिळाल्याचा धक्कादायक आणि अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

लज्जास्पद! मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्स संतापले
विराटचं कुटुंब
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 8:18 PM

मुंबई: अनेकदा माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपल्या आसपास घडत असतात. पण काही घटना ऐकून राग अनावर होऊन एक तीव्र सनक डोक्यात जाते. असचं काहीसं घडलं आहे भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत. यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघाने अतिशय खराब कामगिरी केली आहे. त्यात पाकविरुद्ध पराभवानंतर गोलंदाज मोहम्मद शमीवरही चूकीच्या टीका झाल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर त्याच्या समर्थनार्थ उभा राहणाऱ्या विराटच्या बाबतीत त्याहूनही वाईट घडलं आहे. शमीला समर्थन दिलं म्हणून विराटच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे.

अज्ञात माथेफिरुने अशाप्रकारच्या धमक्या दिल्याचं वृत्त समोर येत असून यावर अधिकृत कोणतंच वक्तव्य अजून आलेलं नाही. पण या सर्वावरुन  नेटीझन्स मात्र कमालीचे संतापले आहेत. सर्वजण ट्विट करत या गोष्टीचा निषेध करत असून आपला राग ट्विटद्वारे व्यक्त करत आहेत. पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हकनेही या गोष्टीचा निषेध व्यक्त करत कोणालाही खेळाडूच्या कुटुंबावर कोणतीच प्रतिक्रिया देण्याचा हक्क नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेक नेटीझन्सनी संताप व्यक्त केला असून एका महिला पत्रकाराने ही गोष्ट वाचून अगदी उल्टी करावीशी वाटत आहे असं ट्विट केलं आहे.

तर काही नेटीझन्सनी आम्ही सर्व विराट आणि त्याच्या कुटुंबासोबत असून ते सुरक्षित राहतील अशाही आशयाचे ट्विट केले आहेत.

का झाली होती शमीवर टीका?

टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. ज्यामुळे चाहत्यांचा राग सोशल मीडियाद्वारे खेळाडूंवर  उफाळून आला.  दरम्यान पाकिस्तानच्या हातून झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला टीकांचा धनी व्हावं लागलं होतं. कारण शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 6 चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले होते. ज्यानंतर सेहवागपासून विराटपर्यंत तसेच अनेक परदेशी क्रिकेटपटूही शमीच्या समर्थनार्थ उभे राहिले होते.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: एखादा चमत्कारच भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो, शाहीद आफ्रिदीची कोपरखळी

न्यूझीलंडकडून पराभवानंतर शोएब अख्तरनंही टीम इंडियाला सुनवलं, म्हणतो ‘मैदानावर क्रिकेट खेळणार की इन्स्टाग्रामवर?’

IND vs NZ: अश्विनला Playing XI मध्ये स्थान न देणाऱ्या कोहलीचा बुमराहकडून बचाव, सांगितलं संधी न देण्याचं कारण

(Indian captain Virat kohlis 10 month old daughter vamika receives rape threats after indiass lost and virat defends Shami)

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.