AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सिक्सर किंग’च्या IPL प्रवासात मोठं वळण! ज्या संघाने एका वर्षात बाहेरचा रस्ता दाखवला, त्याच संघाचा युवराज सिंह प्रशिक्षक बनला

Yuvraj Singh Delhi Capitals Coach: क्रिकेटपटू युवराज सिंग याची इंडियन प्रीमियर लीगच्या २० व्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने सहायक प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

'सिक्सर किंग'च्या IPL प्रवासात मोठं वळण! ज्या संघाने एका वर्षात बाहेरचा रस्ता दाखवला, त्याच संघाचा युवराज सिंह प्रशिक्षक बनला
| Updated on: Oct 13, 2026 | 9:29 PM
Share

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि दोन वेळा विश्वचषक विजेता युवराज सिंग आयपीएलमध्ये एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याची २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहायक आणि फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतासाठी ३०४ एकदिवसीय, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळलेल्या या ४४ वर्षीय खेळाडूने देशाला दोन विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

युवराज सिंगने शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांच्यासह अनेक उदयोन्मुख भारतीय खेळाडूंना मार्गदर्शनही केले आहे. आता तो प्रशिक्षक म्हणून दिल्ली कॅपिटल्सला त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यास मदत करेल, आणि यासह तो पहिल्यांदाच एखाद्या संघाच्या प्रशिक्षण चमूमध्ये औपचारिकपणे सामील होत आहे. “दिल्ली कॅपिटल्ससोबत माझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करण्यास मी खूप उत्सुक आहे. या फ्रँचायझीशी माझा दीर्घकाळचा संबंध आहे आणि मी तिच्या मालकांना चांगले ओळखतो. त्यामुळे ही संधी माझ्यासाठी विशेष आहे, असे युवराजने फ्रँचायझीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

युवराज सिंग म्हणाला की, यावेळी दादा (सौरव गांगुली) यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून काम करण्यास मी देखील उत्सुक आहे. मला क्रिकेट प्रशिक्षणाची प्रचंड आवड आहे आणि या अत्यंत प्रतिभावान संघासोबत काम सुरू करण्यास मी आतुर आहे. मला खात्री आहे की हा एक रोमांचक प्रवास असेल आणि संघाच्या यशात योगदान देण्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन. युवराजच्या नियुक्तीमुळे दिल्ली फ्रँचायझीसोबतचे त्याचे जुने संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दिल्ली फ्रँचायझीने २०१५ मध्ये युवराजला विक्रमी १६ कोटी रुपयांना संघात घेतले होते. ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्या हंगामात युवराज फ्रँचायझीसाठी सर्व १४ सामने खेळला होता. मात्र त्या हंगामात त्याची फलंदाजीची कामगिरी निराशाजनक होती. जीएमआर स्पोर्ट्सचे संस्थापक आणि सह-मालक किरण कुमार ग्रंथी म्हणाले की, युवराजची शानदार कारकीर्द, स्पर्धात्मक स्वभाव आणि खेळाची सखोल समज संघाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.

दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे संस्थापक पार्थ जिंदाल म्हणाले, युवराज हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या सामना-विजेत्यांपैकी एक आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा त्याचा अनुभव, त्याची जिंकण्याची मानसिकता आणि खेळाडूंशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता आमच्या संघासाठी अमूल्य ठरेल. त्याला दादा आणि उर्वरित प्रशिक्षण कर्मचाऱ्यांसोबत काम करताना पाहणे विशेष असेल.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा