AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: युजवेंद्र चहलला संघातील खेळाडूंनी आणलं गोत्यात, सर्व मेहनत एका झटक्यात पाण्यात

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असून शेवटच्या टप्प्यात पंजाब किंग्स संघात विचित्र घडत आहे. सुरूवात चांगली झाली, पण प्लेऑफची जागा जवळ असताना चुकांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तसंच घडलं.

IPL 2026: युजवेंद्र चहलला संघातील खेळाडूंनी आणलं गोत्यात, सर्व मेहनत एका झटक्यात पाण्यात
IPL 2026: युजवेंद्र चहलला संघातील खेळाडूंनी आणलं गोत्यात, सर्व मेहनत एका झटक्यात पाण्यातImage Credit source: PTI
| Updated on: May 06, 2026 | 9:57 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. सर्वाधिक गुण मिळवत सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. आता प्लेऑफचं स्थान दोन विजय दूर आहे. असं असताना शेवटच्या टप्प्यात पंजाब किंग्सकडून वारंवार चुका घडत आहे. त्यामुळे पंजाब किंग्सच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात असंच पाहायला मिळालं. या सामन्यात पंजाब किंग्सच्या खेळाडूंनी तीन सोपे झेल सोडले. इतकंच काय तर हातातली स्टंपिंग सोडली. त्यामुळे पंजाब किंग्सच्या क्षेत्ररक्षणात काही चूक असल्याचं अधोरेखित झालं आहे. पंजाब किंग्सच्या खेळाडूंनी इशान किशनला एक नाही तर तीन संधी दिल्या. इतकंच काय हेनरिक क्लासेनचा सोपा झेल सोडला.

कोणत्या खेळाडूंनी झेल सोडला?

आयपीएल स्पर्धेत विकेट घेण्याची संधी सुटली तर त्याचा फटका गोलंदाजांना बसतो. इशान किशन 9 धावांवर असताना पहिलं जीवदान मिळालं. लोकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर कूपर कॉनलीने सोपा झेल सोडला. त्यानंतर इशान 18 धावांवर असताना आणि एक जीवदान मिळालं. यावेळी झेल सोडण्याची चूक लोकी फर्ग्युसनने केली. इशान 20 धावांवर असताना युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर प्रभसिमरन सिंगने सोपी स्टंपिंग सोडली. त्यामुळे युजवेंद्र चहल संतापल्याचं चेहऱ्यावरून स्पष्ट दिसलं. कारण इशानला दोन जीवदान मिळाले. इतकंच काय तर त्याच्या गोलंदाजीवर हेनरिक क्लासेनचा सोपा झेल सुटला. क्लासेन 9 धावांवर असताना शशांक सिंहने झेल सोडला.

युजवेंद्र चहल ठरला कमनशिबी

युजवेंद्र चहल टीम इंडियात पुन्हा एन्ट्री मारण्यासाठी मेहनत घेत आहे. पण त्याचं नुकसान संघातील खेळाडू करत आहे. या पर्वात त्याच्या खात्यातील 8 विकेट फुकट गेले. त्याच्या गोलंदाजीवर या पर्वात 7 झेल सुटले आणि एक स्टंपिंग मिस झाली.

दुसरीकडे, पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंहने या पर्वात सहा झेल सोडले. म्हणजेच 70 टक्के झेल एकट्या शशांकने सोडले. तर 30 टक्के झेल सोडण्यात पंजाबचे इतर खेळाडू आहेत. पंजाब किंग्सचं सुमार क्षेत्ररक्षण पाहून रिकी पॉन्टिंगही आश्चर्यचकीत झाला आहे. अशीच कामगिरी राहिली तर जेतेपदाचं स्वप्न पुन्हा भंगण्याची शक्यता आहे.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?