AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Final: आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरूत नाही तर….! का बदललं ठिकाण? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम सामना आता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार नाही. यापूर्वी बंगळुरूत होणार असं सांगितलं जात होतं. पण स्पर्धेच्या मध्यात ठिकाण बदलल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पण असं का झालं? ते जाणून घेऊयात..

IPL 2026 Final: आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरूत नाही तर....! का बदललं ठिकाण? जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरू नाही तर....! का बदललं ठिकाण? जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 06, 2026 | 9:32 PM
Share

Bengaluru, Chinnaswamy Stadium: आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची चुरस वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ टॉप 4 मध्ये असून शर्यतीत आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार होता. गतविजेत्या आरसीबी संघाचं होमग्राउंड असल्याने या ठिकाणी आयोजन केल्याचं बोललं जात होतं. पण आता या सामन्याचं ठिकाण बदलणअयात आलं आहे. आता आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. हा सामना आधी बंगळुरूत होणार होता, तर मग बीसीसीआयने स्पर्धेच्या मध्यात ठिकाण का बदललं? अखेर सामन्याचं ठिकाण बदलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात..

अंतिम सामन्याचं ठिकाण का बदललं?

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचं ठिकाण बदलण्याचं कारण म्हणजे तेथे रंगलेलं आमदार प्रकरण… यापूर्वीच हा वाद निस्तरला गेला नाही तर बीसीसीआय वेगळ्या ठिकाणी अंतिम फेरीचं आयोजन करेल अशी चर्चा होती. झालंही तसंच.. आमदार प्रकरण काही सुटताना दिसत नसल्याने बीसीसीआयने अंतिम सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धेच्या ओपनिंग सामन्यापूर्वी काँग्रेसचे आमदार विजयानंद कशप्पनवर यांनी एक प्रस्ताव ठेवला होता. प्रत्येक आमदाराला किमान पाच तिकीटं मिळायला हवीत. आमदार हा लोकप्रतिनिधी असतो आणि त्याला रांगेत उभं राहून वाट पाहावी लागू नये. काँग्रेस आमदाराच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आरसीबी सामन्यासाठी पाच ऐवजी तीन तिकिटांची मागणी प्रत्येक आमदार आणि खासदारासाठी केली होती.

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या वक्तव्यानंतर या वादाला फोडणी मिळाली. इतकंच काय तर तिकीटांचा गैरवापर होईल असे आरोप लावले गेले. पण कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी तिकीटं ऑनलाईन विकत घेतली जातात, त्यामुळे विकत घेतात त्यांचा सहभाग असतो. तिकीट दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येत नाही. त्यामुळे आमदार किंवा त्यांचे कुटुंबीयच त्यांचा वापर करू शकतात. इतरांना त्यांचा वापर करता येणार नाही, असं सांगितलं. अखेर हा वाद टोकाला जात असल्याचं पाहून बीसीसीआयने लागलीच पावलं उचलली. बीसीसीआयने बंगळुरूतील सामना दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला. या शिवाय दुसरा पर्याय नसल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?